
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर
हिंगणघाट कडून कापशी राळेगाव मार्गे यवतमाळ कडे कत्तलीकरिता एका वाहनातून म्हशी घेऊन जात असल्याची गोपनीय माहिती राळेगाव पोलिसांना मिळाली या गोपनीय माहितीच्या आधारे राळेगाव पोलिसांनी दिं २४ सप्टेंबर २०२३ रोजी ३:३० वा. चे सुमारास सहाय्यक पोलीस निरीक्षक, मोहन पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड पोलीस कॉन्स्टेबल संतोष मारबते यांनी राळेगाव येथे चौहान पेट्रोल पंप जवळ नाकाबंदी करून वाहन क्रमांक एम.एच.२० ई. एन २२२५ हा कापसी मार्गे गोवंश जातीचे जनावरे अवैध रित्या जनावरांना कोंबून वाहन भरधाव वेगाने येत होता तेव्हा माहीती मिळालेल्या वाहनाला थांबवून तपासणी केली असता १७ नग म्हशी व अशोक लेलँड कंपनीचा ट्रक असा एकूण १९ लाख ८० हजार मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदर वाहनामध्ये चालक व इतर दोन इसम मिळून आले सदर वाहनाची दोन पंचा समक्ष पाहणी केली असता वाहनात एकुन १७ नग लहान मोठया म्हशी एकून किंमत ७,लाख ८०, हजार रूपयाचे जनावरे व वाहन किंमत १२,लाख रुपये असा एकून किमत १९ लाख ८० हजाराचा मुद्देमाल मिळून आला असून सदर एकून १७ नग म्हैस जातीचे जनावरे यांना देखभाल, चारापाणी व सुरक्षिततेच्या दृष्टीने गोसेवा संवर्धन ट्रस्ट कळंब, ता. कळंब, जि. यवतमाळ यांना रितसर ताब्यात देण्यात आले आहेत.
तरी वाहन क्रमांक एम.एच.२० ई. एन २२२५ चा चालक नामे प्रविण शामसुंदर पतंगे रा. डोगरगाव ता. कळमनोरी जि. हिंगोली व त्याचा साथीदार नामे १) मोहम्मद जुनेद अब्दुल समद कुरेशी रा. विर भगतसिंग वार्ड हींगणघाट ता. हिंगणघाट जि. वर्धा व २) जयसिंग तुकाराम राठोड रा. नामदेववाडी ता. पैठण जि. औरंगाबाद यांचे विरोधात कलम २७९, ३४ भा. द. वी, सहकलम ११ (१) (घ) (ड) (च) (ज) (झ) (ट) प्राण्याना कुरतेने / निदर्यतेने वागविण्याचा प्रतिबंधक अधि. १९६०, सहकलम ११९, १२४ म.पो. का. सहकलम १३९ मोटार वाहन कायदा प्रमाणे होत असल्याने पोस्टे राळेगाव येथे अप.क्र ५२६ / २३ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस अधिक्षक पवन बन्सोड सा, अपर पोलीस अधिक्षक पियुष जगताप सा, उपविभागिय पोलीस अधिकारी, पांढरकवडा विभाग रामेश्वर व्यंजने सा, पोलीस निरीक्षक रामकृष्ण जाधव सा यांचे मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक मोहन पाटील, निलेश गायकवाड, नापोका २३४६ विशाल कोवे चालक नापोका ११२४ सुरज गावंडे, पोका १२२३ निलेश पवार , पोका २५५७ संतोष मारबते, यांच्या पथकाने केली आहे.
