
वडकी पासून काही अंतरावर असलेल्या कारेगांव पुलाजवळ एका दुचाकीस्वाराला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली.या अपघातात दोन्ही दुचाकीस्वार जागीच ठार झाले आहेत.हि दुर्दैवी घटना २३ जुन मंगळवार रोजी दुपारी ५ वाजताच्या दरम्यान घडली.
दत्तुजी ननकटे रा.सिंधी मेघे.जि.वर्धा व फकिरचंद बुरबादे रा.सालोड जि.वर्धा असे या अपघातात ठार झालेल्या इसमांचे नाव असून ते दोघेही मारेगांव तालुक्यातील मार्डी येथून नातेवाईकांचा अंत्यविधी आटोपून एम.एच.३२ ए.सी.६३५० या क्रमांकाच्या दुचाकीने आपल्या गावी राम राम घेऊन वडकी मार्गे जात होते.दरम्यान राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वरील कारेगांव जवळील पुलाजवळ त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली.या अपघातात ते दोघेही जागीच ठार झाले.दरम्यान या घटनेत वडकी ठाणेदार विजय महाले यांनी भरधाव वाहन चालवने लायसन न बाळगणे हेल्मेट न घालने या कलमान्वे मृतकांनवर वडकी पोलीसात गुन्हा दाखल केला असून घटनेचा पुढील तपास ठाणेदार विजय महल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार रमेश मेश्राम करीत आहे
अज्ञात वाहनाची दुचाकीला जोरदार धडक,
= दोन दुचाकीस्वार जागीच ठार.
