
राळेगाव तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर
दिनांक 30 जानेवारी 2023 ला सोनामाता हायस्कूल चहांद येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या प्रतिमेला अभिवादन करून हुतात्मा दिन साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मुख्याध्यापक धोबे सर, शिवणकर सर, प्रमुख अतिथी कांबळे सर,चिव्हाणे सर, राजूभाऊ झोटिंग,हजर होते सर्वप्रथम गांधीजींच्या प्रतिमेचे पूजन करून श्रद्धांजली वाहण्यात आली. विद्यार्थ्यांनी महात्मा गांधींच्या जीवनातील प्रसंगांना उजाळा दिला. कांबळे सर यांनी आपल्या प्रास्ताविक पर भाषणात गांधीजींच्या कार्यावर प्रकाश टाकला. आणि राजूभाऊ शूटिंग यांनी सुद्धा गांधीच्या जीवनातील सत्य, अहिंसा, या तत्वांबद्दल माहिती सांगितली. विद्यार्थ्यांनी गांधीजींच्या जीवनाचा आदर्श घ्यायला हवा असे शिवणकर सर यांनी आपल्या अध्यक्ष भाषणात सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सावंत सर यांनी केले तर आभार दांडेकर सर यांनी मानले. कार्यक्रमाला सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी हजर होते.
