कोपरा खुर्द चा सरपंच सुनील वाघमारे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात,जॉबकार्डवर सही करण्याकरिता दहा हजार रुपयाची स्वीकारली लाच

यवतमाळ प्रतिनिधी
प्रवीण जोशी


महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत वैयक्तिक सिंचन विहिरीचे कामगार लावून केलेल्या कामांचा मजुरांच्या जॉब कार्डवर सही करण्याकरिता कोपरा खुर्द चे सरपंच सुनील वाघमारे यांनी दहा हजार रुपये लाच स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्याने सापळा रचून त्यांच्यावर कार्यवाही करण्याची घटना दिनांक १९ जुलै रोजी ढाणकी येथे घडल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
कोपरा खुर्द येथील तक्रारदार यांनी आपल्या आईच्या नावाने मंजूर झालेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत वैयक्तिक सिंचन विहिरीचे कामगार लावून केलेल्या कामांच्या मजुरांच्या जॉब कार्डवर सही करण्याकरिता सरपंच सुनील वाघमारे यांनी तक्रारदाराला दहा हजार रुपयाची मागणी केली. यावरून तक्रारदाराने थेट लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली. विभागाने तत्परतेने सापळा रचून कार्यवाही सुरू केली. ढाणकी ते उमरखेड रोडवरील रविचंद्र गादिया यांचे लेआउट मधील मोकळ्या जागेमध्ये आरोपीने लाचेची रक्कम स्वीकारली व अधिकाऱ्यांनी त्यांना रंगेहात पकडले.
सदर कार्यवाही मारुती जगताप पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अमरावती परिक्षेत्र, देविदास घेवारे अप्पर पोलीस अधीक्षक , उत्तम नामवाडे पोलीस उपअधीक्षक यवतमाळ घटक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनायक कारेगावकर , पोलीस निरीक्षक अमित वानखेडे , सचिन भोयर , महेश वाकोडे, अब्दुल वसीम, भागवत पाटील आणि संजय कांबळे यांनी केली.