एच आय व्ही एड्स व लैंगिक आजाराबाबत जनजागृती
“नवचैतन्य संस्थेचा पुढाकार”

सहसंपादक : रामभाऊ भोयर

राळेगांव तालुक्यातील जळका, बस स्थानक राळेगांव तसेच रात्री ला जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथक, जिल्हा सामान्य रुग्णालय यवतमाळ (जिल्हा शल्य चिकित्सक कार्यलय यवतमाळ) तथा नवचैतन्य बहु विकास संस्था शिरोली अंतर्गत लोक जागृती कलापथक कार्यक्रम चे आयोजन करण्यात आले होते राळेगांव येथील कामगार बांधव , विद्यार्थी व ग्रामस्थ यांना एचआयव्ही एड्स व लैंगिक आजार बाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
घाटंजी तालुक्यातील नवचैतन्य बहु विकास युवा मंडळ शिरोली ता घाटंजी जि यवतमाळ या संस्थेच्या चमुने स्थलांतरीत कामगारांसाठी एचआयव्ही एड्स बाबत कलापथकाच्या माध्यमातून मार्गदर्शन केले. त्यामध्ये एचआयव्ही प्रसार मुख्य चार प्रकारे होते पहिला अत्यंत महत्त्वाचा असुरक्षित लैंगिक संबंध, बाधित व्यक्तीचा रक्त पुरवठा घेतल्यामुळे, तिच तिच सिरंज किंवा सु़ई चा वापर केल्यामुळे, बा़धित गर्भवती मातेपासुन होणाऱ्या बाळाला एचआयव्ही चा संसर्ग होतो त्या मुळे “संयम पाळा एड्स टाळा” असा संदेश कलापथकाच्या माध्यमातून दिला त्याच बरोबर पत्नीशी एकनिष्ठ राहा, असुरक्षित लैंगिक संबंधाच्या वेळी निरोध चा वापर करा,दरवेळी नवी सु़ई व नवी सिरींज चा वापर करा रक्तपेढीतुन एचआयव्ही मुक्त च रक्ताचा पुरवठा करा त्याच बरोबर अधिक माहिती साठी शासकीय टोल फ्री क्रमांक १०९७ चा वापर करा असे आव्हान संस्थेचे सांस्कृतिक प्रमुख प्रफुल्ल रा.राऊत यांनी कलेच्या माध्यमातून केले.त्यांना सहकार्य लाभले संस्थेचे सचिव राहुल जीवने तसेच नितेश मोहुर्ले,कु. रविना मानकर, कु रिमा रामटेके प्रशांत लोखंडे,मारोती पेंदोर, उल्हास लोखंडे, गणेश उईके यांनी कार्यक्रम च्या यशस्वी ते साठी अथक परिश्रम घेतले.
वरील कार्यक्रम आयोजित करण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक सर, तसेच जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथक जिल्हा सामान्य रुग्णालय यवतमाळ च्या प्रिती दास मॅडम तसेच वर्षा बडनखे मॅडम समुपदेशक, श्रीकांत लाभसेटवार प्रयोगशाळा तंत्रज्ञ ग्रामीण रुग्णालय, राळेगांव, तसेच ग्रामीण मुक्ती ट्रस्ट संस्थे चे मा श्री गणेश मानुसमारे सर, कु पुजा सौंदयकर मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रम ला रावेरी चे उपसरपंच गजानन झोटिंग, पोलीस पाटील पुरुषोत्तम काकडे, तंटामुक्ती अध्यक्ष नितेश हिवरकर, व हजारो कामगार व गणेश बोरेकर, भुषण उंडे व समस्त ग्रामस्थ उपस्थित होते.