
ग्रामस्थांनी वैद्यकीय अधिकारी व संदीप जाधव यांचे मानले आभार
लोकहीत महाराष्ट्र उमरखेड
तालुका प्रतिनिधी: संदीप बी जाधव
ढाणकी आरोग्य केंद्रावर जाऊन पत्रकार संदीप बळीराम जाधव यांनी मेट गावाच्या आरोग्य कल्याणासाठी कळकळीची विनंती केली असता वैद्यकीय अधिकारी डॉक्टर स्वाती मुनेश्वर एमबीबीएस यांनी भव्य शिबिराची योजना ग्रामपंचायत कार्यालय मेट मध्ये काल दिनांक 10 मार्च रोजी सकाळी नऊ ते बारा या वेळेत समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर श्री. मनोज कुमार , श्री आर एस खोकले एम पी डब्ल्यू, डीपी हंबर्डे एम पी डब्ल्यू, ब्लड टेस्ट साठी लॅब असिस्टंट श्री एस व्ही भोयर यांच्या निदर्शनाखाली पार पडला त्यामध्ये ब्लड चेक शुगर टेस्ट सीबीसी टेस्ट बीपी चेक व रोगी यांना औषधे गोळ्या देऊन सर्दी खासी ताप या रोगावर योग्य निदान केले. त्यामध्ये गावातील महिला वर्ग, गर्भवती महिला व इतर लोकांचाही समावेश होता. वैद्यकीय अधिकारी यांच्या आदेशावरून मेट ग्रामपंचायत कार्यालयात पत्रकार च्या उपस्थितीमध्ये पार पडले.
