साखरा राजापूर गावाचा रपटा वाहून गेल्याने संपर्क तुटला,पुलाचे काम अर्धवटच

साखरा राजापूर गावच्या मुख्य रस्त्यावरील पुलाचे बांधकाम सुरू असून पावसाळा सुरू होण्यापूर्वी पुलाचे बांधकाम पूर्ण होणे गरजेचे होते परंतु पुलाचे बांधकाम अपूर्ण असल्याने पर्यायी रस्ता तयार करण्यात आला होता. मागील दोन दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे हा पर्यायी रस्ता वाहून गेला.त्यामुळे या गावाचा संपर्क तुटला आहे.याचा फटका गावातील विद्यार्थ्यांना ,ज्येष्ठांना बसत आहे

गावातील एखाद्याला रुग्णालयात न्यायचे असल्यास पर्यायच उपलब्ध नसल्याने मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या पुलाचे बांधकाम लवकर पूर्ण करून गावकऱ्यांना सुविधा करून देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.