
सहसंपादक:- रामभाऊ भोयर
दिनांक १२/ ६/ २०२३ रोजी सोमवारला शासन आपल्या दारी या संकल्पनेतून माननीय खासदार भावना ताई गवळी यांच्या नेतृत्वात शासकीय योजना ची जत्रा हा मुख्य मंत्री एकनाथ शिंदे साहेब तथा देवेंद्र फडणवीस साहेब उप मुख्यमंत्री यांच्या संकल्पनेतून शासनाचा उपक्रम सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचण्याकरिता यवतमाळ येथील रेस्ट हाऊस मध्ये ११ वाजता मीटिंग आयोजित केली आहे सदर बैठकीला नगराध्यक्ष, नगरसेवक, ग्रामपंचायत सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, तसेच इतर लोकप्रतिनिधी यांनी उपस्थित राहावे यामध्ये शासनाच्या विविध योजनेतून घरकुल मजूर कामगार योजनेचा लाभ विविध प्रकारचे दाखले तसेच शेतकऱ्यांसाठी कृषी पंप सोलर शासनाच्या अनेक योजना सर्वसामान्य शेतकरी तसेच इतर नागरिकांपर्यंत पोहोचवण्याकरिता ही मीटिंग आयोजित केली आहे तरी यवतमाळ लोकसभा मतदारसंघातील जास्तीत जास्त लोकप्रतिनिधींनी उपस्थित राहावे व या योजना सर्व सामान्य नागरिकाला लाभ कशाप्रकारे मिळून देता येईल या करिता माननीय खासदार भावना ताई गवळी मार्गदर्शन करणार आहे.
