शाळकरी विद्यार्थ्यांच्या गाडीचा अपघात एक गंभीर तर तीन किरकोळ जखमी

वरोरा:- तालुक्यातील पावना – धानोली या मार्गावर दि. 5 ऑगस्ट रोजी वाहन क्रमांक MH 40 BF 1847 या गाडीचा झालेल्या अपघातात एक शाळकरी मुलगी गंभीर जखमी झाली,तर 3 मुलींना किरकोळ जखमा झाल्या. ही घटना सकाळच्या सुमारास घडली.
मुधोली येथील रहिवाशी बालाजी उर्फ रोहित लोडे हा नेहमीप्रमाणे पावना – धानोली येथील विद्यार्थिनींना हिरालाल लोया ज्युनिअर कॉलेज वरोरा येथे आपल्या टाटा मॅजिक क्रमांक MH 40 BF 1847 या वाहनाने मुधोली – पावना येथून ने आण करण्याचे काम करायचा आज सकाळी 11:30 च्या सुमारास कॉलेज सुटल्यानंतर सुहानी निरंजन बेंद्रे वय 16 वर्ष राहणार पावना, ही गंभीर जखमी झाली तिला त्वरित उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले तर श्रद्धा डोळस वय 17 वर्ष राहणार पावना, अनुष्का ठावरी वय 16 वर्ष पावना, यश रोडे वय 17 वर्षे धानोली हे किरकोळ जखमी झाले. प्राप्त माहितीनुसार बालाजी रोडे दुचाकी वाहनाला वाचविण्यासाठी त्याने गाडीचे ब्रेक मारले मात्र ब्रेक मारताच गाडीने 3 पलटी घेतल्या सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.

वाहतूक विभागाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष?


वरोरा शहरातील शाळा कॉलेजमध्ये असंख्य विद्यार्थी खेडे विभागातून शिक्षणासाठी या खाजगी वाहनाचा वापर करीत असतात या खाजगी वाहनांकडे मात्र पोलीस विभागाचे संपूर्णपणे दुर्लक्ष आहे. तेव्हा अशा खाजगी वाहनांवर पोलीस विभाग कारवाई करतील का असा प्रश्नही आता उपस्थित झाला आहे.