
प्रतिनिधी,प्रवीण जोशी
ढाणकी.
बिटरगाव बु,, तालुका उमरखेड येथे क्रांतिवीर बिरसा मुंडा जयंती व तंट्या मामाc स्मृतिदिन साजरा करण्यात आला, कार्यक्रमाच्या सुरुवातीला संपूर्ण महामानवाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले, त्रिवार अभिवादन करून ध्वजारोहण करण्यात आले, त्यानंतर प्रबोधन सत्राला सुरुवात झाली, कार्यक्रमाचे अध्यक्षा सौ गोकर्ण बाई शंकर देवकते ( सरपंच ) बिटरगाव हे होत्या, प्रमुख पाहुणे, श्री प्रताप भोस ठाणेदार बिटरगाव व भोजने साहेब वन्यजीव आर एफ ओ हे होते, कार्यक्रमाचे प्रास्ताविक विनोद नंदकुमार मामीडवार यांनी केले, यानंतर बिटरगाव ग्रा, पं, उपसरपंच श्री प्रकाश पुंजाराम पेंधे यांनी बिरसा मुंडा व तंट्या मामा यांच्या जीवनावर प्रकाश टाकला, आदिवासी समाजाने शिक्षणाकडे विशेष लक्ष दिल्यास आपल्या कुटुंबाची व देशाची प्रगती होईल येणारी पिढी आपल्यासाठी झगडणार्या व क्रांती करणाऱ्या महामानवास विसरणार नाहीत, त्यांचे प्रेरणास्थान कायम राहून त्यांनी दिलेल्या बलिदानास व्यर्थ जाऊ देणार नाहीत म्हणून सर्व आदिवासी समाजाने शिक्षणाची कास धरावी त्याचबरोबर व्यवसाय शेतीकडे लक्ष दिल्यास आपल्या कुटुंबाची प्रगती निश्चितच होईल असे विचार व्यक्त केले, या कार्यक्रमाला सर्व उपस्थित असलेले, मा, गांधी तंटामुक्त अध्यक्ष, श्री मोहन ग्यानबा कोंडेवाड, देवकते पोलीस पाटील, कोंडबाजी इंगोले, ग्रा, पं सदस्य, शिवाजी शीरगरे, तुकेश कांबळे, नंदू भाऊ बुटले, संजू भाऊ देवकते, वनिताताई देवकते ग्रा, पं, सदस्य, शिवाजी हाके, बंडू भाऊ देवकते, डॉक्टर सुरेश तिवारी संदेश भाऊ कांबळे उत्तम शिरगरे, भारत राठोड, व समस्त बिटरगाव येथील चा संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजक राजूभाऊ पिटलेवाड व संपूर्ण आदिवासी महिला व पुरुष यांनी मोलाचे योगदान दिले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वसंता नरवाडे यांनी केले,
