
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर
दिवसेंदिवस वाढत्या महागाईच्या भडक्यात व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत जवळपास २४०० रुपये पर्यंत गेली आहे त्यामुळे हजारात मिळणाऱ्या घरगुती गॅस सिलेंडर वापर आता हॉटेल तसेच चहा टपऱ्यावर मोठ्या प्रमाणात होताना दिसून येत आहे.
हॉटेल चहा टपरीवर घरगुती गॅस सिलेंडरचा वापर करणे व्यवसायिकांना बंधनकारक असतानाही सर्रास कायद्याचे उल्लंघन होत असून याकडे पुरवठा विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे वेगवेगळ्या रेशन कार्ड वर घरगुती वापरासाठी गॅस सिलेंडर घेऊन त्याचा व्यावसायिक कारणासाठी वापर केला जात असून हा प्रकार शहरासह ग्रामीण भागातही सर्रास सुरू आहे. शहरातील चहा टपरीवर तसेच हॉटेलच्या स्टॉलवर तर बहुतांश ठिकाणी घरगुती गॅस वापरला केला जात आहे. गॅसच्या अशा वापरामुळे मानवी जीवितास धोका ही संभवू शकतो गॅसच्या अशा बेकायदा वापराबाबत पोलीस व पुरवठा विभागाकडून कारवाई होते मात्र त्यात सातत्य नसल्याचे दिसत आहे.
व्यावसायिक सिलेंडरचा वापर घटला
दिवसेंदिवस सिलेंडरची भाववाढ मोठ्या प्रमाणात होत असून या सिलेंडरच्या दरवाढीमुळे छोटे व्यावसायिक घरगुती गॅस टाकीचा वापर करताना दिसत आहे .पण बेकायदा वापराबाबत प्रशासनाकडून वेळीच कार्यवाही झाली नाही तर त्याचे प्रमाण आणखी वाढणार आहे. तर होऊ शकतो गुन्हा दाखल
व्यावसायिक ठिकाणी जर घरगुती गॅस टाकीचा वापर केला तर पुरवठा विभाग व पोलिसांमार्फत कारवाई केली जाते पुरवठा विभागाकडून या संदर्भात तपासणी मोहीम राबवली तर असे कृत्य असणाऱ्यांवर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले जाऊ शकते.
