ट्रॅक्टर सोडण्याचा आदेश निघूनही ट्रॅक्टर प्रशासनाच्या ताब्यात,न्यायालयाचा आदेशात उल्लेख नसतानाही एस डी ओ नी लावला दंड

संग्रहित फोटो

न्यायालयाच्या आदेशाचा अपमान.

ढाणकी प्रतिनिधी -प्रवीण जोशी.


अवैध रेती वाहतुकी प्रकरणी पोलीस स्टेशन बिटरगाव बु ने केलेल्या कारवाई मध्ये न्यायालयाने दंड भरून ट्रॅक्टर सोडण्याचा आदेश देऊनही प्रशासनाने ट्रॅक्टर न सोडल्याने न्यायालचा अपमान झाल्याची घटना ढाणकी येथे घडली.
शहरात अवैध रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर मालक शेख फयाज यांचा ट्रॅक्टर बिटरगाव पोलिसांनी दिनांक 15 ऑक्टोबर रोजी पकडला आणि संबंधित मालकावर गुन्हा नोंद करून प्रकरण न्यायप्रविष्ठ करण्यात आले. न्यायालयच्या आदेशानुसार तहसील प्रशासनाने अवैध रेती वाहतूक ट्रॅक्टरला 33073 रु चा दंड लावला. नयालयाने दिलेल्या आदेशामध्ये कोठे ही उपविभागीय अधिकाऱ्यांच्या दांडाचा उल्लेख नसताना ही उपविभागीय अधिकारी उमरखेड यांनी सुद्धा दंड भरण्यासाठी संबंधित ट्रॅक्टर मालकाला सांगत असल्याने न्यायालयाच्या आदेशाचा अपमान होत असल्याचा प्रकार घडत आहे.
नियमानुसार अवैध रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर पकडल्यानंतर मालकावर कारवाई झाली, गुन्हा नोंद झाला आणि न्यायालयाने सुद्धा ट्रॅक्टर सोडण्याचा आदेश दिला असल्यावर ही ट्रॅक्टर सोडण्यात आला नसल्याने मालकाचे खच्चीकरण होत आहे.
यामुळे हतबल झालेल्या ट्रॅक्टर मालकाने सर्व दंड भरूनही उपविभागीय अधिकारी न्यायालयच्या आदेशाचा अपमान करत दंड लावत असल्याने आता उपोषणाचा इशारा दिला आहे.

प्रतिक्रिया –
माझा ट्रॅक्टर पकडल्यानंतर माझ्या वर गुन्हा नोंद झाला. न्यायालयाने तहसील प्रशासनाचा 33073 रु दंड भरण्याचे सांगून ट्रॅक्टर रिलीज करण्याचा आदेश दिला. मी तो दंड भरल्यावर आता उपविभागीय अधिकारी अधिकचा दंड भरण्यास सांगत आहे. न्यायालयच्या आदेशात असा कुठलाही उल्लेख नव्हता. न्यायालयाने आदेश देऊनही अद्याप माझा ट्रॅक्टर सोडण्यात न आल्याने हा माझ्यावर अन्याय आहे. मला न्याय न मिळाल्यास उपोषणाला मी बसेल.

शेख फयाज , ट्रॅक्टर मालक ढाणकी