कठनी येथून बेंगलोर कडे राशनचे गहू घेऊन जाणारा ट्रक पलटी,वडकी येथील घटना

सहसंपादक : रामभाऊ भोयर

मोफत वाटपासाठी राशनचे गहू घेऊन जाणारा ट्रक पलटी झाल्याची घटना दी ४ ऑक्टोंबर रोजी सायंकाळी ७ वाजता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वरील वडकी येथे सिंग धाब्यासमोर घडली.
ट्रक क्रमांक के ए ६७,१०६५ हा कठणी येथून बेंगलोर कडे राशनचे गहू घेऊन वडकी मार्गे जात होता. दरम्यान राष्ट्रीय महामार्ग क्र ४४ वरील सिंग धाब्यासमोर ट्रकचा मेन पट्टा तुटल्यामुळे ट्रक चालकाचे स्टेरिंग वरील नियंत्रण सुटले व ट्रक पलटी झाला. या ट्रकमध्ये गव्हाच्या सुमारे तीनशे गोण्या होत्या. त्यामुळे काही काळ रस्त्यावर वाहतुकीची कोंडी झाली होती. सुदैवाने यामध्ये कोणतीच जीवितहानी झाली नसून मात्र ट्रकचे नुकसान झाले आहे.घटनेची माहिती वडकी पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी येऊन रहदारी पूर्ववत सुरू केली व हमालाच्या मदतीने रस्त्यावरील गहू बाजूला करत रस्ता मोकळा करून वाहतूक सुरळीत केली़.