राळेगाव येथे सोयाबीन खरेदीसाठी मंगळवारपासून आँनलाईन नोंदणी सुरू

सहसंपादक : रामभाऊ भोयर

दि.विदर्भ काॅ ऑप. मार्केटिंग फेडरेशन लिमिटेड नागपूर शाखा यवतमाळ यांच्या मार्फत राळेगाव तालुका सहकारी खरेदी विक्री संघ राळेगाव र‌. न.304 यांच्या वतीने सर्व राळेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना सुचित करण्यात येते की खरीप हंगाम 2024-25 मध्ये किमान हमीभाव योजनेअंतर्गत सोयाबीन खरेदीसाठी ई.समृद्धी पोर्टलवर आँनलाईन नोंदणी दिनांक 1/10/2024 रोज मंगळवारपासून प्रारंभ होत असून शेतकऱ्यांनी येताना आधार कार्ड, सात बारा २०२४_२५ चा आँनलाईन सोयाबीन पेरा असलेला, आधार कार्ड झेरॉक्स ,बॅंक पासबुक (IFSC code ) सहीत, शासनाने ठरून दिलेल्या निकषानुसार खालील प्रमाणे फक्त एफ‌.ए.क्यू‌ दर्जाचा माल खरेदी करण्यात येईल. नोंदणीची वेळ कार्यालयीन वेळेत सकाळी ११ ते सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत असून हमीभाव 4892 रूपये जाहीर झाला असून याबाबत सविस्तर माहिती पाहिजे असल्यास 9579984161, 9689064356 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष मिलिंद इंगोले व सचिव संजय जुमडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.