नाईक चौक ते सुभाष चौकाचे रस्त्याचे काम त्वरित करा भाजप ज्येष्ठ नागरिक आघाडी व ओबीसी मोर्चाचे तहसीलदार व नगरपरिषदेला निवेदन

जिल्हा प्रतिनिधी::यवतमाळ
प्रविण जोशी


शहरातील कै. वसंतराव नाईक चौक, विर्दभविर गोधाजीराव मुखरे, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, नेताजी सुभाषचंद्र बोस चौका पर्यंत रस्त्याचे काम त्वरित करून देण्याची मागणी केली आहे वरील रस्ता अतिशय महत्त्वाचा असून या रस्त्यावर फार मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते मुख्य बाजार पेठेला जोडणारा मार्ग आहे. हा रस्ता अतिशय खराब झाला असुन जागोजागी मोठमोठे खड्डे पडले आहेत व जागोजागी अतिक्रमण झाले आहे मोठ्या रोड डिव्हायडर मुळे रोड अरुंद झाला आहे प्रचंड खड्ड्यामुळे सर्व नागरिक त्रस्त असून ज्येष्ठ नागरिकांना पाठ व कंबर दुखी चे आजार वाढले आहे. त्याचप्रमाणे या मार्गावर हरित क्रांतीचे कै. वसंतरावजी नाईक विदर्भविर गोधाजीराव मुखरे घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर नेताजी सुभाषचंद्र बोस.या महामानवाचे पुतळे असल्यामुळे जनतेच्या श्रद्धेचा विषय आहे यापूर्वी अनेक वेळा या रोडच्या संदर्भात आंदोलने करण्यात आले परंतु दुर्दैवाने प्रशासनास पाझर फुटला नाही नविन रस्ता ताबडतोब बनवून देण्यची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली मागणी पूर्ण न झाल्यास उपोषणाचा मार्ग अवलंबवा लागेल असा इशारा देण्यात आला. या पुर्वी सुध्दा भारतीय जनता पार्टी पुसदच्या वतीने अनेक निवेदन , रस्त्याचे लग्न सोहळा, बेशर्म लावगण करणे, पिंडदान, मुरूम टाकणे आंदोलन नगर परीषद पुसद सत्ताधारी विरोधात आंदोलन केले.. परंतु नपासत्ताधाऱ्यांनी कुठलीही दखल घेतली नाही. आज भारतीय जनता पार्टी जेष्ठ नागरिक आघाडीचे जिल्हा अध्यक्ष विनोद जिल्हेवार यांच्या नेतृत्वात.भाजपा ओबीसी मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष शेखर वानखेडे. भारत पाटील जिल्हा सरचिटणीस ओबीसी मोर्चा. भाजपा नेते महेशभाऊ नाईक.डाॅ. रूपाली जयस्वाल भाजपा महिला ओबीसी मोर्चा जिल्हा अध्यक्षा. लक्ष्मणराव आगाशे भाजपा ओबीसी जिल्हा उपाध्यक्ष.भाजपा नेते जेष्ठ नारायणराव मुडाणकर, वसंतराव देशमुख, पुरुषोत्तम डुब्बेवार,माधवराव भरगाडे, नंदनवार साहेब माजी नायब तहसीलदार, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष विक्रांत जिल्हेवार, अभिजित गंधेवार, गोकर्णाताई. तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.