1

(ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ५० हजार रुपये मदत देण्यासाठी रास्तारोको आंदोलन)
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
राळेगाव तालुक्यात मनसे द्वारे शेतकरी, शेतमजूर व सर्वसामान्य जनतेच्या न्याय मागण्यांना वाचा फोडण्याचे भरीव कामं करण्यात येतं आहे. या मुळे राजकीय क्षेत्रात मनसेचा एक वेगळाच दबदबा निर्माण झाला असून याचा प्रत्यय आज पुन्हा रास्तारोको आंदोलनादरम्यान आला.ओला दुष्काळ जाहिर करा, हेकट्रि पन्नास हजार रुपयाची मदत दया या मागणीसाठी तालुकाध्यक्ष कर्तव्यदक्ष शंकरभाऊ वरघट यांचे नेतृत्वात रास्तारोको आंदोलन करण्यात आले. याला प्रचंड प्रतिसाद मिळाला.
राळेगाव तालुका ओला दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकऱ्यांना पिक विमा,व हेक्टरी ५०हजार रुपयांची मदत करण्यात यावी यासाठी मनसेच्या वतीने राळेगाव येथे रास्तारोको आंदोलन करण्यात आले.
अतिवृष्टीमुळे शेतातील पिकांची प्रचंड नासाडी होवुन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे त्यामुळे शेतकरी पुरता संकटाच्या खाईत सापडला असुन आज त्याच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहुन बळ देण्याची गरज आहे त्यामुळे पिकांची झालेली नुकसान पाहता भरपाई म्हणुन त्यांना तत्काळ हेक्टरी ५०हजार रुपये मदत करण्यात येवुन पिक विमा तत्काळ मंजुर करण्यात यावा, अति पावसामुळे तालुक्यातील अनेक घरांची पडझड झाली त्यांना सुद्धा आर्थिक मदत देण्यात यावी यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तालुकाध्यक्ष शंकर वरघट यांच्या नेतृत्वात राळेगाव येथे तहसिल कार्यालयासमोर महामार्गावर रास्तारोको आंदोलन करण्यात आले.या आंदोलनामुळे काही काळ वाहतुक विस्कळीत झाली होती. या आंदोलनामध्ये मनविसे तालुकाध्यक्ष शैलेशजी आडे,मनसे तालुका उपाध्यक्ष गणेशभाऊ काकडे तालुका सरचिटणीस गणेश मांदाडे, राहुल गोबाडे, नरेंद्र खापने, श्रीकांत मोहितकर जगदीश गोबाडे गौरव चवरडोल, कलंदर पठाण, प्रज्वल पावडे, बंटी गवारकर,, महेश येलेकर, विनोद पोटे,, दिनेश भडे, अमर येलेकर, सचिन मंगळ, दिनेश पोटे,सुधीर भडे,महेंद्रा येलेकर,अजय पाल, समीर येलेकार कैलास कोळसे,कुणाल बावणे,साईल पांडे,सागर मंगळ, अनिकेत नंदूरक ,अमोल पोटे,राजू वाघाडे, प्रदीप ठाकरे, पवन कोसे, राजू डवरे, संदेश येलेकार, विजय वाघाडे ,गणेश कोळसे, विजय मडावी,गिरीश कुंभलकर,हनुमान राखुंडे,सुरेश खडसे, रुपेश टेकाम,रुपेश राखुंडे योगेश कुडमथे, शुभम कुंभलकर,विजय येटे विशाल अंडरसकर अक्षय गुरुनुले उमेश पेंदोर नरेंद्र खापणे, अविनाश डाहूले, डोमाजी पारखी,बंडू भारसखरे,श्रीकांत मोहितकर,किशोर आत्राम अनिल वाढई .प्रमोद मांदाडे संदीप गुरणूले मंगेश मांदाडे मनोज लेनगुरे प्रफुल धाबेकर निलेश धाबेकार गोपाल मांदाडे गणेश मांदाडे गणेश मोहूले नरेश मांदाडे हर्षल मांडेकर विशाल राऊत,प्रसाद परचाके,रोशन बावणे, विजय मुंडली, संदीप मेश्राम कुणाल घोडाम, रुपेश रामगडे, सुरज तोडासे, रोशन मोगरे,धीरज मोगरे,आकाश तोडासे .रुपेश टेकम . संकर राऊत.सुमित देवणारे.अमित सुरपाम. रामू देवनारे. सुभाश आत्राम. संतोष बोरकर आणि महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते
या आंदोलनादरम्यान राळेगाव पोलीसांनी बंदोबस्त ठेवला होता.
