
प्रतिनीधी नितेश ताजणे वणी
वणी पोलीस स्टेशन च्या वतिने दिनांक 12 सप्टेंबर रोजी शांतता समितीची सभा दुपारी एक वाजता येथील वसंत जिनिंग हॉलमध्ये घेण्यात आली.
पोळा,तान्हापोळा, गणेश चतुर्थी, ईद इत्यादी सणानिमीत्य शांतता व सुव्यवस्था राखण्याचे दृष्टिकोनातून शांतता समितीची बैठक घेण्यात आली होती. सदर सभा ही वणी विधानसभेचे लोकप्रिय आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांच्या अध्यक्षते खाली घेण्यात आली.
सदर सभेला प्रमुख उपस्थिती पियुष जगताप एडिशनल एसपी यांची होती तर प्रमुख पाहुणे म्हणून एसडीपीओ गणेश केंद्रे यांची उपस्थिती होती तसेच मंचावर नगर परिषदेचे मुख्याधिकारी विजय लोहकरे, ना. तहसीलदार विवेक पांडे व इतर मान्यवर उपस्थित होते.
सुरुवातीला उपस्थितांचे शब्दसुमनाने स्वागत करण्यात आले तर मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर उपस्थित असलेले शांतता कमेटीच्या सदस्यांनी माइकवर आप आपल्या समस्या मांडल्या.
प्रास्ताविकेमध्ये एसडीपीओ केंद्रे यांनी एका गाढवाच्या कथेतून असामाजिक तत्व निर्माण करणारे लोकांपासून सावधान राहून सामाजिक जागृती बद्दल विचार कथन केले! त्यानंतर शांतता समितीचे सदस्य राजाभाऊ पाथ्रडकर, रज्जाक पठाण यांनी आप आपल्या समस्या मांडल्या. त्याचप्रमाणे निलीमाताई काळे, किरणताई देरकर यांनी देखील आपल्या समस्या मांडून आपले मनोगत व्यक्त केले. तर समाजसेवक नारायण गोडे यांनी पोलीसांच्या विविध समस्या सोडविण्याची मागणी केली.
त्यानंतर बैठकीचे अध्यक्ष आमदार संजिवरेड्डी बोदकुरवार यांनी आपल्या भाषणातून यापुढे येणाऱ्या सणांमध्ये सर्वांनी बंधुत्वाच्या भावानेतून गुण्या गोविंदाने सन साजरे करावेत असे आवाहन केले. अपर जिल्हा पोलीस अधीक्षक पियुष जगताप यांनी सभेत चर्चिल्या गेलेल्या समस्येवर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. गणेश चतुर्थी निमित्त मिरवणुकीच्या वेळी शहरातील सर्व प्रमुख मार्ग मोकळे करण्याच्या सूचना दिल्या तसेच सदर मार्गावरील सुरू असलेले बांधकाम मिरवणुकीच्या वेळी बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या.
तसेच पोलिस प्रशासनासह पोलीस पाटलांनी गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांवर अवलंबून न राहता स्वयंसेवकाची मदत घेण्याचे आवाहन देखील यावेळी त्यांनी केले तसेच येणाऱ्या सणासंबंधी समस्त बांधवांनी प्रशासनास सहकार्य करावे असेही आवाहन त्यांनी केले.
सदर सभे करिता वणी, मारेगाव, पाटण, शिरपूर, मुकुटबन येथील ठाणेदार उपस्थित होते. त्याचप्रमाणे वाहतूक शाखेच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सीता वाघमारे सुद्धा हजर होत्या.
सदर सभेकरिता शांतता समितीचे सदस्य, वणी, मारेगाव, झरी तालुक्यातील पोलीस पाटील, गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते तसेच महिला मंडळाची उपस्थिती लक्षणीय होती.
ठाणेदार अजित जाधव आणि त्यांच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी सदर बैठकीचे छान आयोजन केले होते.
सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी ए.एस. आय शेखर वांढरे व पोलीस बांधवांनी परिश्रम घेतले.
