शासकीय आश्रमशाळा किन्ही जवादे येथे दहीहंडी उत्सव साजरा

राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर

पांढरकवडा प्रकल्प अंतर्गत येत असलेल्या राळेगाव तालुक्यातील एकमेव शासकीय आदिवासी आश्रमशाळा किन्ही येथे आज दिनांक 7/9/2023 रोजी दहीहंडीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ह्या प्रसंगी विद्यार्थ्यांनी राधा व कृष्ण यांची वेशभुषा केली होती. मुलां मुलींची स्वतंत्ररित्या दही हंडी फोडण्याची स्पर्धा घेण्यात आली. शेवटी सर्वांना काल्याचे वितरण करण्यात आले. ह्यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका वानखडे मॅडम, ज्येष्ठ शिक्षक कडू सर, अधीक्षक दूंगे सर, अधिक्षिका इंगळे मॅडम, तासिका शिक्षक कु. जुमनाके व कु. गेडाम, रोजंदारी कर्मचारी नानाजी पेंदोर, रवी परचाके, आशिष लोणबळे, घनश्याम मेश्राम आणि गणेश पवार यांची उपस्थिती होती.