
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राष्ट्रमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचे औचित्य साधुन दिनांक– १२/०१२०२५ रोजी सकाळी ११ वाजता व्यंकटेश महाजन वरिष्ठ महाविद्यालयातील खासदार प्रमोद महाजन सांस्कृतिक सभागृह धाराशिव येथे स्वाभिमानी शिक्षक व कर्मचारी महासंघ आणि मंत्रालय समन्वय समिती मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने प्रा.पुरुषोत्तम येरेकर सर यांना महात्मा फुले राज्यस्तरीय आदर्श पुरस्काराने,” सन्मानित करण्यात आले. राज्यभरातील सामाजिक व शैक्षणिक कार्यामध्ये अग्रेषित असणाऱ्या प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षकांना गौरविण्यात आले आहे. प्राध्यापक पुरुषोत्तम येरेकर यांचे सामाजिक व शैक्षणिक संघटिक कार्य नाविन्यपूर्ण होते आणि आजही त्यांचे कार्य नियमित, अविरत चालू आहेत याच कार्याची पावती त्यांना सामाजिक शैक्षणिक कार्याचे मूल्यमापन म्हणून कार्यक्रमांचे अध्यक्ष प्रा.ड्रॉ. बापूसाहेब आडसूळ यांच्या शुभ हस्ते राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे त्याचबरोबर प्राचार्य डॉक्टर श्री बापूसाहेब आडसूळ यांनी आपल्या अध्यक्ष भाषणातून आवर्जून सांगितले की महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर संघटना चे राज्यसंघटक सन्माननीय श्री.प्रा.पुरुषोत्तम येरेकर सरांच्या मार्गदर्शनातून वीस वर्षातील प्रदीर्घ शैक्षणिक अनुभवानुसार अनेक विद्यार्थी शैक्षणिक खेळाडू क्षेत्रात प्राविण्य मिळवीत समोर गेले आहेत आणि स्वतःचे जीवन जगत राज्याची व देशाची सेवा करीत आहेत. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्री.प्रा. ड्रॉ. बापूसाहेब अडसूळ सर यांनी भुसवले तर कार्यक्रमांचे उद्घघाटक म्हणून सुरेश अण्णा पाटिल, आणि प्रमुख अतिथी म्हणून ऑ. श्री.तुकारामजी शिंदे साहेब, श्री. पांडुरंगजी ढोकणे सौ. रेखाताई ढोकणे तसेच प्रा. भाऊसाहेब खिचडे, प्रा. गंगाधर पांडचुरे , श्री. आशीष ढोकणे तसेच सौ. प्रणाली ढोकणे कार्यक्रमाला उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमाला संपुर्ण महाराष्ट्रातून हजारोच्या संख्येने उच्च माध्यमिक शिक्षक उपस्थित होते. हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी मेहनत स्वाभिमानी शिक्षक व कर्मचारी महासंघ आणि मंत्रालय समन्वय समिती मुंबई यांच्या संयुक्त संघटनेचे सचिव. प्रा. मारोती खरात व राज्य उपाध्यक्ष प्रा. श्री. देविदास जगताप धाराशिव यांनी घेतली.
