गोंडीयन समुहाचे सांस्कृतिक शक्तीपीठ कचारगड याची नोंद पुरातत्व विभागाने घेवून विकासाची कामे केली पाहिजे – मधुसूदन कोवे

सहसंपादक: रामभाऊ भोयर

कचारगड दर्शन,हे निसर्ग निर्मित पंहादी पारी कुपार लिंगो आणि काली कंकाली यांच्या तप़ोभुमी चे शक्तीपीठ आहे.या निसर्ग निर्मित “”तपोवन तपोभूमी”” ची नोंद पुरातत्व विभागाने घेवून दप्तरी ठेधली पाहिजे असे स्पष्ट मतं कचारगड यात्रा येथे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित मंचावर स्पष्ट केले* दिनांक १० ते १४ पर्यंत चालू असलेला कचारगड दर्शन सांस्कृतिक आणि सामाजिक गोंडीयन समुहानी लाखो लोकांच्या सहभागातून एक महाशक्ती चा प्रभाव दाखवनारा होता १३ फेब्रुवारी २०२५ च्या पहिल्याच सत्रात उपस्थित मा.मधुसुदन कोवे गुरुजीअध्यक्ष, ग्राम स्वराज्य महामंच यांना सामाजिक मार्गदर्शन करण्यासाठी निमंत्रण दिले होते म्हणून कचारगड गोंडीयन पंच कमिटी धनेगाव जी गोंदिया याचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले.या शक्तीपीठात लाखो समाज बांधव दर्शन घेतात यात मध्ये प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा,ओरीसा, उत्तरप्रदेश, झारखंड, विदर्भ प्रांत, अनेक समुदायातील लोक या गुपामधे जावुन आपली मनोकामना पूर्ण करताना दिसतात. काही सरकारचे लोकप्रतिनिधी आमंत्रित होते सोबत सामाजिक कार्यकर्ते सुध्दा आमंत्रित होते या मंचावर सहज संधी उपलब्ध होत नाही परंतु मा मनोहर ऊईके यांच्या सुचनेप्रमाणे पंचकमेटीने दखल घेवून माझी निवड झाली हे मी माझे भाग्य समजतो मतं व्यक्त करुन कचारगड पंच कमिटी धनेगाव चे आभार मानले प्रामुख्याने आमच्या सोबत सहभाग मा मधुसूदन कोवे गुरुजी अध्यक्ष ग्राम स्वराज्य महामंच,मा मनोहर ऊईके, सालेकसा शिल्प कला केंद्र,मा बळवंतराव मडावी गोंडवाना एकता परीषद प्रदेश अध्यक्ष, गजानन कुमरे,राजाराम मडावी आणि असंख्य गोंडीयन समाजातील समुदाय सहभागी होता.