स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करण्यासाठी आता गावा गावात जाऊन तरुणांना, आणि, शेतकरी , शेतमजूर, यांना या लढ्यात सामील करण्यासाठी “विदर्भ कट्टा” अभियान राबविणार – मधुसूदन कोवे

विदर्भातील लोकांची दिशाभूल आणि पिळवणूक मोठ्या प्रमाणात होत आहे राज्य सरकार विदर्भातील लोकांचा विश्वासघात करत आहे विदर्भातील लोक प्रतिनिधी मुंग गिळून गप्प बसून आहे विदर्भाच्या मागणीसाठी एक शब्द बोलत नाही हा सरकारचा जुल्मिपणा विदर्भातील लोकांनी सहन करु नये.

राज्य सरकारने आणि केंद्र सरकार ने विदर्भ राज्य निर्माण करण्यासाठी खोटे आश्वासन दिले विदर्भ नागपुर कराराचा सत्ताधारी सरकार भंग करत आहे तिन वर्ष झाली विदर्भात एक ही अधिवेशन झाली नाही हा नागपूर कराराचा विश्वासघात आहे अपेक्षाभंग आहे म्हणून विदर्भ राज्य आंदोलन समिती आता शांत बसणार नाही आता गावा गावात जाऊन तरुणांना शेतकरी शेतमजूराना महिलांना सहभागी करुन “विदर्भ कट्टा” अभियान राबविण्यासाठी मधुसूदन कोवे गुरुजी यांनी पुढाकार घेतला आहे

विदर्भवादी नेते मा ॲड.वामनराव चटप, मा.प्रकाशजी पोहरे संपादक दैनिक देशोन्नती वृत्तपत्र यांच्या शी चर्चा करताना “विदर्भ कट्टा ” राबवुन विदर्भ राज्य आंदोलन समिती चा आंदोलन कार्यक्रम आयोजित करण्याचे ठरले आहे