
राळेगाव तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर
कोरोणा सारख्या महामारी च्या दोन लाटे मध्ये तुटपुंज्या वेतनात,स्वतः व आपल्या कुटुंबीयांच्या जीवाची पर्वा न करता दिवसरात्र अविरत आरोग्य सेवा घरोघरी देणाऱ्या राळेगांव तालुकयातील आशा वर्कर भगिनींना समाजसेवक रमेश कन्नाके यांनी तीळ संक्रांत सणाचं औचित्य साधून साडी चोळी देऊन सन्मान केला आहे.
या प्रशंसनिय कार्या बाबत आशा वर्कर भगिनीं ची तीळ संक्रांत रमेश भाऊ नी गोड केली व महिलां साठी महत्त्वाच्या तीळ संक्रांत सणात मदती चा हात भगिनींना दिल्या बद्दल समाधान व्यक्त होत आहे.
