
पोंभूर्णा तालुका प्रतीनीधी:- आशिष नैताम
पोंभूर्णा :- सर्वत्र पावसाने कहर केला असुन नादि नाले ओसांडून वाहत आहेत अशातच तालुक्यातील बोर्डा बोरकर येथील विनोद रघूनाथ कुनघाडकर वय वर्ष ५६ हा इसम दिनांक २१/०७/२०२४ रोजी घरून गेला असता दुसर्या दिवसापर्यंत घरी परतला नाही त्यामुळे आप्तेष्टांनी सर्व शोध घेतला मात्र त्याचा कुठेहि शोध लागला नाही दुसर्या दिवशी दुपारच्या सुमारास त्याचे कपडे नाल्याच्या काठावर असलेल्या झाडाला बांधलेले आढळून आल्याने सदर इसम पुराच्या पाण्यात वाहून गेला असा संशय वर्तविण्यात आला लगेचच पोलीसांना भ्रमणध्वणी वरून माहीती दिली असता पोलीस प्रशासन घटणास्थळी दाखल झाले आणि रेस्क्यु टिमच्या सहाय्याने सर्वत्र शोध घेण्यात आला मात्र पोलीस प्रशासनाच्या अथक प्रयत्ना नंतरहि तो इसम कुठेहि सापडला नाही मात्र आज दुपारी साधारणता एक वाजताच्या सुमारास नाल्यात एक प्रेत आढळून आले चौकशीअंती सदर इसम हा विनोद कुनघाडकर असल्याचे निष्पन्न झाले घरचा कर्ता पुरुष असा अचानक गेल्याने कुटुंबावर दुखःचे डोंगर कोसळले असून विनोद कुनघाडकर यांच्या मागे पत्नी,दोन मुली एक मूलगा नातवंड असा बराच मोठा आप्त परीवार आहे सदर प्रेत शवविच्छेदनासाठी पाठवीले असून घटनेचा पूढील तपास पोंभूर्णा पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री. मनोहर कोरेठी साहेब यांच्या मार्गदर्शनात पोलीस कॉन्सटेबन मंगेश श्रीरामे व टिम करीत आहेत
