

राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील वरूड बोराटी जंगलात गेल्या चार वर्षापूर्वी अवनी वाघीणच्या 13 शेतकऱ्यांच्या घेतलेल्या बळीच्या बाबतीत पूर्ण महाराष्ट्रात दहशत निर्माण झाली होती.त्या वाघीणच्या हल्ल्याच्या दहशतीमुळे शेतकरी शेतात जाणे बंद झाले होते.मजूर मजूरीसाठी जात नव्हते.स्त्रीया सरपण घेण्यासाठी बाहेर पडत नव्हत्या, विद्यार्थी बाहेरगावी शाळेत जाण्यास तयार होत नव्हते.अशा अवस्थेत परिसरातील लोक जगत असताना वनविभागाने वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग करून अवनी वाघीणला जिवंत पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले होते. वनविभागाने मीशन टी वन हा प्रयोग राबविण्यात आला.या मिशनमध्ये अवनीला जिवंत पकडण्यासाठी सापळा रचला गेला.यासाठी देशातील प्रख्यात शुटर व वन्य जीव अभ्यासक नवाझ शफाजत अल्ली व त्यांचा मुलगा अजगर अली यांनी या मोहिमेत सहभागी होऊन आपल्या परिसरातील शेतकरी शेतमजूराना धीर दिला. ही लढाई सुरू असताना 2नोव्हेंबर 2018 रोजी अवनी ठार झाली, याबाबत अनेक मान्यवर मंडळींनी वेगवेगळ्या प्रकारचे आपले विचार मांडले. परंतु अवनी वाघीणची दहशत ज्या लोकांनी अनुभवली त्यांनी सुटकेचा श्वास सोडला.यात चार वर्षांपूर्वी ज्या परिवारातील लोकांनी कुणी पती,कुणी आई,कुणी मुलगा, कुणी बाप तर कुणी आपले नातलग गमावले याकरिता, ज्यांनी आपले जीव गमावले त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ दिनांक 2 नोव्हेंबर 2022 रोज बुधवारला बोराटी येथे त्यांच्या नावाची कोणशिला स्थापन करून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार असून या कार्यक्रमात शार्प शुटर नवाज शफाअत अली यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून या कार्यक्रमात वन्य प्राण्यांपासून नुकसान टाळण्यासाठी कशाप्रकारे उपाययोजना करावी याबद्दल सुद्धा मार्गदर्शन करण्यात येणार आहे.तरी या कार्यक्रमात 2नोव्हेंबर रोज बुधवारी ठीक 4वाजता बोराटी येथे हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन अरविंद फुटाणे व अंकुश मुनेश्वर यांनी केले आहे.
