50 हजार रुपये प्रोत्साहन पर अनुदान तात्काळ द्या

सहसंपादक: रामभाऊ भोयर

नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून 50 हजार रुपये द्यायचे शासनाने ठरवले आहेत काही शेतकऱ्यांना ते मिळाले पण अजूनही अनेक शेतकरी या योजनेपासून वंचित आहे त्यांना तात्काळ पन्नास हजार रुपयांचे प्रोत्साहन पर अनुदान द्या अशा आशयाचे निवेदन राळेगाव ग्राविकाच्या वतीने विधानसभेचे विरोधी पक्षनेता विजय वडेट्टीवार यांना देण्यात आले महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी सन्मान योजना 2019 अंतर्गत नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहन पर अनुदान द्यायचे शासनाने ठरवले राळेगाव ग्राविकाच्या काही शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला पण अजूनही अनेक शेतकरी या योजनेच्या लाभापासून वंचित आहे त्यांना तात्काळ 50 हजार रुपये अनुदान देण्यात यावे काँग्रेसच्या जनसंवाद यात्रेनिमित्त विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार शहरात आले होते तेव्हा त्यांना वरील आशयाचे निवेदन देण्यात आले निवेदन देताना राळेगाव ग्राविकाचे अध्यक्ष सचिन हुरकुंडे उपाध्यक्ष राजेश काळे संचालक जानराव गिरी कृष्णा राऊळकर विनायक नगराळे अशोक पिंपरे तातेश्वर पिसे गजानन पाल विनोद नरड गजानन महाजन प्रभाकर राऊत विभा गांधी ज्योती डाखोरे आदी उपस्थित होते.