
सहसंपादक : रामभाऊ भोयर
चिखली (व) येथे दरवर्षी तान्हा पोळा साजरा केला जातो परंतु या वर्षी लोकेश दिवे मित्रपरिवार तर्फे भव्य तान्हा पोळ्याचे आयोजन करण्यात आले होते व विविध बक्षीस ठेवण्यात आले त्यामुळे चिमुकल्यांची वेगवेगळी वेशभूषा,महापुरुषांचे प्रबोधनात्मक संदेश,शेतकरी या सारख्या विविध विषयांवर चिमुकल्या बालगोपालांनी सर्व गावाचे लक्ष वेधून घेतले,यावेळी परीक्षकांच्या निरीक्षणात पहिल्या पाच चिमुकल्या विजेत्यांची निवड करण्यात आली प्रथम क्रमांक मनाचा नंदी म्हणून श्लोक रमण वैरागडे या चिमुकल्याची निवड करण्यात आली व प्रथम बक्षीस म्हणून मोठी सायकल देण्यात आली,द्वितीय बक्षीस समर्थ अतुल पडोळे यांना स्टडी टेबल, तृतीय बक्षीस विधीन मुन यांना छोटी सायकल,चौथं बक्षीस विहान शेंड यांना कॅरम बोर्ड, पाचवे बक्षीस युवांश ठाकरे यांना खेळाचा घोडा,देण्यात आले व प्रोत्साहन पर बक्षीस म्हणून सर्व शेकडो बालगोपाल चिमुकल्यांना टिफिन बॉक्स देण्यात आले,तसेच सेवानिवृत्त शिक्षक गोपालराव भटकर यांचा शाल-श्रीफळ-भारतीत संविधान भेट देऊन जाहीर सत्कार सर्व लोकेश दिवे मित्रपरिवार यांच्या तर्फे करण्यात आला, गोपालराव भटकर यांच्या मार्फत असे सांगण्यात आले की लोकेश दिवे मित्रपरिवार आपल्या गावासाठी खुप सुंदर आणि गाव हिताचे काम करत आहे त्यांचे स्तुत्य उपक्रम गावाच्या विकासासाठी कमी येईल अस मत आहे,लोकेश दिवे मित्रपरिवार तर्फे तान्हा पोळा आयोजित केल्याबद्दल चिमुकल्या बाळगोपालांच्या चेहऱ्यावरील आंनद पाहून गावातील जनतेचे मन भारावून गेले असा प्रसंग गावात सदैव राहो असे जनतेचे मत आहे, या सामाजिक उपक्रमाचे गावात खुप मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे यांनतर असे सामाजिक उपक्रम लोकेश दिवे मित्रपरिवार तर्फे होत राहील असे सांगण्यात आले,यावेळी परीक्षक म्हणून जिल्हापरिषद शाळेचे शिक्षक तथा मुख्याध्यापक संदिप ईखार सर, bcci चे राजकुमार बेताल सर,प्रतिष्ठित नागरिक गोपालराव भटकर सर यांच्या सह प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस पाटील कांचनताई घायवटे, कवडुजी उमाटे, केशवराव पडोळे,रंगराव खैरे,अभयराव पुडके,दिपकराव नगराळे,दिनेश कुमरे, वामनराव उमाटे,गजाननराव भटकर,सतीशराव पडोळे, तानाजी ठाकरे, कामिनाबाई आत्राम यांच्या सह लोकेश दिवे मित्रपरिवारातील लोकेश दिवे, स्वप्नील ठाकरे,दुर्वेश उमाटे,क्षितिज घायवटे,साहिल वनकर, आकाश वनकर,उमेश रहाटे,अविनाश पडोळे, दिनेश आखरे,सुहास उमाटे,संजय हुलके,यांच्या सह असंख्य नागरिक महिला तथा बाळगोपाल उपस्थित होते.
