राळेगावच्या जिनींग समोरील अपघातातील महिलेचा मृत्यू

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

राळेगांवच्या कळंब रोडवर असलेल्या सिमेंट रोडवर महालक्ष्मी जिनींग समोर १ मार्च २०२२ रोजी १ सायंकाळी ५.३० वाजता कारची धडक लागुन २ महिला जखमी झाल्या होत्या. त्यातील एकीचा मृत्यू झाला. या बाबत मिळालेल्या माहीती नुसार घटनेच्या दिवशी मृतक सौ. सुशिला पुरुषोत्तम कावळे (५५) व जखमी श्रीमती मायाबाई या दोन्ही महिला सिमेंट रोडवरुन पायदळ घरी जात होत्या. अज्ञात कार चालकाने निष्काळजीपणाने कार चालविली. त्या दोघींना धडक दिली. त्यामुळे गंभिर जखमी झालेली सुशिला कावळे हिचा मृत्यू झाला. तर जखमी मायाबाईवर उपचार सुरु आहे. यातील मृतक महिलेचा मुलगा संदिप पुरुषोत्तम कावळे (३३) रा. शिवाजी नगर राळेगांव याच्या तक्रारीवरुन अज्ञात वाहन चालका विरुद्ध कलम २७९, ३३७, ३३८ ३०४ (अ) भादवि नुसार गुन्हा दाखल केला.