
राळेगाव, २९ ऑगस्ट :
हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त इंदिरा गांधी कला महाविद्यालय, राळेगाव येथे राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा करण्यात आला.या निमित्ताने महाविद्यालयात मुले विभागासाठी कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला आणि दमदार खेळ करून क्रीडास्पर्धेचे सौंदर्य वाढवले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. ए. वाय. शेख होते. त्यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना खेळातून आत्मअनुशासन, आरोग्य आणि नेतृत्वगुण विकसित करण्याचे महत्व सांगितले.या कार्यक्रमाला श्री. बाराहाते हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रात प्रगती करण्यासाठी मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे आयोजन शारीरिक शिक्षण व क्रीडा संचालक डॉ. किरण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. त्यांनी विद्यार्थ्यांना नियमितपणे खेळात सहभागी होण्याचे आवाहन केले.कबड्डी स्पर्धेतील विजेत्यांना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे समारोप “क्रीडा आरोग्यदायी व तंदुरुस्त भारतासाठी” या संदेशाने करण्यात आला.
