
सहसंपादक : रामभाऊ भोयर
यावर्षी तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीने तालुक्यातील मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून जवळपास 80 टक्के मोसंबीच्या उत्पादनात घट आली आहेत त्यामुळे मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांचे धाबे दणाणले आहेतllll पूर्वी राळेगाव चा परिसर संत्रा उत्पादनासाठी प्रसिद्ध होता पण गेल्या काही वर्षापासून डिंक्यासारख्या रोगाच्या आक्रमणामुळे तसेच इतरही कारणामुळे संत्र्याचे उत्पादन घटले होते त्यामुळे संत्रा उत्पादक शेतकरी मोसंबी फळबागेकडे वळले राळेगाव, सावनेर ,रावेरी, पिंपरीदुर्ग, पिंपळखुटी, झाडगाव ,सावंगी, वाढोणा बाजार, खडकी सुकळी आदी गावांमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी मोसंबीची लागवड केली आहेत मात्र यावर्षी अतिवृष्टीमुळे मोसंबीच्या उत्पादनात मोठी घट आली आहेत अतिवृष्टीमुळे मोसंबीचे बहुतांश फळ गळाले निंबाच्या आकाराचे फळ पूर्णता गळाले फळगळ झाल्याने मुळात फळच कमी होते आणि त्यातही आता पिकावर सततच्या पावसाने बुरशीचा प्रादुर्भाव झाला बुरशीमुळे ही मोठ्या प्रमाणात फळगळ झाली सद्यस्थितीत मोसंबीवर फळमाशीचा प्रादुर्भाव आहेत पूर्वी ट्रॅप लावले असता त्यात फळमाशीचा बंदोबस्त होत होता पण आता त्या ट्रॅप ला सुद्धा फळमाशी जुमानत नाहीत फळमाशीने एकदा तयार झालेल्या फळाला डंक केला की दोन-चार दिवसांमध्ये ते फळ खाली येते जो 20% तयार म** होता होता तो अशा रीतीने खाली आला नवरात्र मध्ये मोसंबीचा म** तयार होतो पण आता दिवाळी आली तरी मोसंबीचा म** तयार होईल का नाही अशी शंका शेतकऱ्यांच्या मनात आहे सोबतच अतिवृष्टीमुळे मोसंबीच्या पिकात तणाचे साम्राज्य आहेत अशा शेतामध्ये कुठल्याही व्यापारी शेतातील मोसंबीचा सौदा करणार नाहीत तसेच मोसंबीची तोड करण्यासाठी कुठलाही मजूर त्या शेतात जाणार नाहीत त्यामुळेच शेतकऱ्याला ते शेत स्वच्छ करावे लागेल तणाचे व्यवस्थापन करण्याचे काम सध्या शेतकरी करत आहेत तणाच्या व्यवस्थापनासाठी सुद्धा शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणात खर्च येत आहेत एकंदरीतच काय तर यावर्षी अतिवृष्टीमुळे मोसंबी उत्पादक शेतकऱ्याचा आर्थिक कणा मोडला असून मोठे आर्थिक नुकसान झाले आहे आचारसंहिता लागण्यापूर्वी शासनाने हेक्टरी 25 हजाराची मदत करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी मोसंबी उत्पादक शेतकरी करीत आहेत
