
प्रतीनिधी : प्रवीण जोशी
ढाणकी…..
बुद्धीची देवता अशी ओळख असलेले विनायक हे प्रत्येकाचे आराध्य दैवत. गणरायाची स्थापना शहरात अनेक मंडळांनी केली. त्यामुळे सर्वत्र आनंदाच व चैतन्याच व जल्लोशाच वातावरण निर्माण झाले. गणरायाच्या आगमनाची आज सकाळपासूनच भक्तामध्ये भक्तीमय धामधुम सुरू होती.
आपल्या गणरायाच्या आगमनाचे जंगी स्वागत करण्यासाठी गणेश मंडळांनी तयारी केली असून स्थापनेपूर्वी शहरातून ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढून गणरायाचे जल्लोशात आणि भक्ती भावाने महिला मंडळांनी व सर्व भक्तांनी स्वागत केले.
पुढचे दहा दिवस सार्वजनिक मंडळाकडून कडून मुर्ती स्थापनेच्या ठिकाणी अनेक धार्मिक कार्यक्रम गणेश मंडळाजवळ होणार असल्याचे समजते. आरतीच्या ताला सुरामुळे सभोवतालचे वातावरण भक्तीमय व अपार श्रध्देत नाहून निघणार आहे.
यंदाचा गणेश उत्सव खुप विशेष आहे.मागील काही दिवसापासून रुसून बसलेल्या वरून राजाने कृपादृष्टी केली. पाण्याच्या संकटातून मुक्त केले यामुळे शेतकऱ्यासह भक्तांच्या चेहऱ्यावर आनंदाचे फवारे उडतांना दिसत होते.बाजारात मोठया साधारण व लहान गणरायाची मुर्ती खरेदी करतांना गणेश भक्तांची गर्दी उफाळून आली होती. तर मंडपवाले ,मुर्तीकार व संबंधीत इतर व्यवसायीकांच्या व्यसायात मोठी वाढ झाली.१० दिवसाच्या गणरायाच्या मुक्कामात सार्वजनिक गणेश मंडळाकडून विविध सामाजीक उपक्रमासह सांस्कृतीक कार्यक्रमाची मेजवाणी ढाणकी करांना ऐकावयास व पाहण्यास मिळणार आहे.
गणरायाचे आगमण पहिल्या दिवशी अगदी थाटामाटात ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत शहराच्या मुख्य रस्त्याने मिरवणूक काढत जल्लोशात भक्ताकडून श्रध्दा पूर्वक जंगी स्वागत झाले
चौकट – पोलीसांचा फौजफाटा ठिकठिकाणी तैनात,आगामी काळात गणरायाच्या स्थापनेपासून पुढील १० दिवस गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर ढाणकी शहरात शांतता व सुव्यवस्था अबाधीत राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने जोरदार तयारी केली आहे.काही गुन्हेगारावर पोलीस स्टेशनच्या हद्दीबाहेर जाण्याच्या नोटीसा बजावल्या तर अनेक जणांवर प्रतिबंधात्मक कारवाईचा बडगा उगारला. गणेश भक्तांना आरती व इतर सांस्कृतीक कार्यक्रमाला भयमुक्त वातारणात बाहेर पडूण हजेरी लावता यावी म्हणून ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात ठेवला.ठाणेदार प्रेमकुमार केदार, पोलीस उपनिरीक्षक शिवाजी टीपूर्णे,राहुल कोकरे,गजानन खरात,रवी गीते,शरद चव्हाण, नीलेश भालेराव, शहरातील हालचालीवर बारकाईचे लक्ष ठेवत आहेत.
