सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील पिंपळखुटी येथील समीर महादेव पाल व माधुरी समीर पाल हे दोघे पती पत्नी राळेगाव कडून कळंब कडे दुचाकीने जात असताना आगारातून येणाऱ्या भरधाव बसची दुचाकीला धडक बसली असून या धडकेत पत्नी माधुरी पाल ही गंभीर जखमी झाली तर समीर पाल हा किरकोळ जखमी झाल्याची घटना दिं.२२ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी तीन वाजता च्या दरम्यान एस टी आगारा समोर घडली आहे.
राळेगाव आगाराची बस क्रमांक एम एच १४ एम एच ००७८ ही बस आगारातून भरधाव वेगात बस स्थानकाकडे जात होती तर दुचाकी क्रमांक एम एच २९ डी वाय ६४५२ समीर पाल व माधुरी पाल हे दोघेजण कळंब येथे जात असताना राळेगाव आगारातून येणाऱ्या भरधाव वेगाने येणाऱ्या बसला दुचाकीची धडक बसली या धडकेत पत्नी माधुरी पाल ही गंभीर रित्या जखमी झाली असून समीर पाला किरकोळ जखमी झाला या घटनेची माहिती फिर्यादी मंथन दिलीप पाल यांनी पोलीस स्टेशनला दिली असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले व जखमींना ग्रामीण रुग्णालयात येथे हलविण्यात आले असून येथील डॉक्टरांनी जखमीला पुढील उपचाराकरिता यवतमाळ येथे पाठविण्यात आले आहे.या घटनेचा पुढील तपास ठाणेदार शीतल मालटे यांच्या मार्गदर्शनात गोपाल वास्टर करीत आहे.
