
प्रतिनिधी:: प्रवीण जोशी
ढाणकी
आर्यवैश समाजाचे आराध्य असलेल्या कुलस्वामिनी वास्वी माता अर्थातच कण्यका परमेश्वरी देवीचा जन्मोत्सव ढाणकी येथे शोभायात्रा व ढोलताशा व फटाक्याच्या आतिषबाजीत मोठ्या उत्साहात जन्मोत्सव साजरा करण्यात आला. ढाणकी येथे आर्यवैश्य समाजातर्फे रविवारी माताचा जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला महिला मंडळींनी कुंकू मार्चन हा कार्यक्रम आयोजित केला होता. व ढोल ताशाच्या गजरामधे अतिशय थाटामाटात व शांततेत तितक्याच जल्लोषात शोभायात्रा काढून जन्मोत्सव साजरा करण्यात आला यावेळी मिरवणुकीत समाजातील ज्येष्ठ नागरिक आणि सर्व समाजबांधव उपस्थिती होते यावेळी बिटरगाव(बु)पोलीस स्टेशनचे ठाणेदार कैलास भगत यांनी अनुचित प्रकार घडू नये म्हणून चौख बंदोबस्त ठेवला होता
