वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी
बोरी ईचोड येथे नागपूर कराराची होळी


सहसंपादक : रामभाऊ भोयर


आज दी २८ /९/२४ रोज शनिवारला 2वाजता विदर्भ राज्य. आंदोलन. समिती,शेतकरी संघटना व विदर्भवादी बोरी ईचोड ता. राळेगाव जि. यवतमाळ यांच्या वतीने “नागपूर कराराची होळी “स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीची ज्योत काळम पेटवत ठेवण्याच्या दृष्टीने दरवर्षी प्रमाणे यावर्षी २८सप्टेबंर १९५३च्या नागपूर कराराची होळी करण्यात आली.विदर्भ आर्थिक दृष्टीने सपन्न आहे. अलग झाल्यास आमची प्रगती आणखी होईल.जनतेला आमचा प्रश्न आहे. आम्हाला सांगा नागपूर करार हा विदर्भाच्या जनतेवर अन्याय नाही का?विदर्भाच्या लोकांचा राज्याची राजधानी मन्हूण नागपूर शहराशी घनिष्ठ सबंध आहे. हया अनुषंगाने फायदेही मिळवाळची जाणीव आम्हाला आहे. विदर्भाच्या अमलाबजावणीकरिता तज्ञाचा सल्ला विचारात घेऊन योग्य ते पाऊल उचलण्यात येईल हे करारात नमूद आहे.वेगवेगळ्या घटकातील लोकांचा प्रशासकीय दृष्टीने अधिक चागल्या प्रकारे सहयोग साधने मन्हजे विकेंद्रिकरण होय यावेळी शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष राजेंद्र झोटिग, विदर्भ राज्य आंदोलन समिती तालुका अध्यक्ष गोपाल भोयर, शेतकरी संघटना युवा आघाडी अध्यक्ष अक्षय महाजन, दशरथ काळे साहेब, गजानन ठाकरे, निलेश डवरे, भास्कर पाटील, गजानन आवारी,सीध्दार्थ पाटील ,घर्षण गमे, गौरव महाजन, रामकृष्ण बोंडे, मोहन आवारी
यावेळी वेगळ्या विदर्भाच्या समर्थनात घोषणा देण्यात आल्या. जोपर्यत वेगळा विदर्भ मिळत नाही तोपर्यत संघर्ष चालू ठेवण्याचा सर्वांनी सकल्प घेतला यावेळी मोठया संख्येने विदर्भवादी हजर होते.