
प्रतिनिधी शेख रमजान
बिटरगांव ( बु )येथील रतन नाईक नगर येथील प्रथमच पहिला भारतीय सैन्य दलात अग्नीवीर प्रशिक्षण पूर्ण करून पहिला युवक अलीकडे एक अत्यंत गर्वाचा आणि आनंदाचा प्रसंग अनुभवास आला. आपल्या गावातील सुपुत्राने भारतीय सेनेतील “अग्नीवीर” म्हणून निवड होऊन प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर जेव्हा तो प्रथमच आपल्या मातृभूमीत परतला, तेव्हा संपूर्ण गावाने त्याचे जल्लोषात स्वागत केले.
शाळकरी मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांनी देशभक्ती गीत व फुलांची उधळण करत, घोषणांनी आसमंत दणाणत त्याचे स्वागत केले. गावकऱ्यांनी अभिमानाने त्याला मिरवणुकीतून गावात फिरवले.
बिटरगांव ( बु )पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास भगत, बिटरगांव ( बु ) ग्रामपंचायतचे उपसरपंच प्रकाश पेंदे माजी सैनिक उत्तमराव शिरगरे व वसंतराव नाईक कृषी माध्यमिक विद्यालय बिटरगांव (बु) येथील शिक्षक कमलाकर दुलेवाड व आयोजितानी केशव गणेश चव्हाण सत्कार समारंभात त्याला पुष्पहार, शाल, श्रीफळ देऊन छत्रपती शिवाजी महाराज चौकात सन्मानित करण्यात आले. अग्नीवीराने आपल्या अनुभवांची थोडक्यात माहिती दिली व युवकांना सैन्य सेवेत सामील होण्याचे आवाहन केले. त्यानंतर रतन नाईक नगर येथे गावातील नागरिकांनी स्वागत सोहळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून वसंतराव नाईक कृषी विद्यालयाचे शिक्षक कमलाकर दुलेवाड होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून बिटरगांव (बु) पोलीस स्टेशनचे जमादार अर्जुन राठोड, दत्ता कवडेकर ग्रामपंचायत चे उपसरपंच प्रकाश पेंदे, माजी सैनिक उत्तमराव शिरगरे, भारतीय सैन्य दाखल असलेले शुभम कळलावे जिल्हा परिषद शाळेचे रतन नाईक नगर मुख्याध्यापक कैलास चव्हाण सर, कारभारी हिरामण पवार असामी बाबू सिंग चव्हाण विनोद राठोड नाईक यावेळी अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांनी केशवचे वडील गणेश चव्हाण व आई सावित्रा चव्हाण पुणेरथा चव्हाण यांचे शाल व श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहस्त्रकुंड आवाज चे संपादक सुभाष नाईक यांनी केले तसेच आभार प्रदर्शन सुद्धा सुभाष नाईक यांनी मांनले.
या स्वागत सोहळ्याने संपूर्ण गावात देशभक्तीची भावना जागृत केली. प्रत्येक गावकऱ्याच्या चेहऱ्यावर अभिमान आणि आनंदाचे भाव होते.
