
!
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री राजमाता जिजाऊ माँसाहेब यांना मानाचा मुजरा आणि त्यांनी केलेल्या कार्याला सलाम. राजमाता जिजाऊंचा जन्म 12 जानेवारी 1598 मध्ये बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे झाला. शिवरायांच्या राज्याभिषेकानंतर बारा दिवसांनी 17 जून 1664 साली जिजाऊंनी रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड या गावी अखेरचा श्वास घेतला. राजमाता जिजाऊं यांच्या स्मृतीदिनी सावित्रीबाई फुले वाचनालयात त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी अध्यक्ष श्री.प्रा. बाळासाहेब राजूरकर सर, प्रमुख पाहुणे श्री. प्रभाकरराव मोहितकर सर, संचालक श्री.प्रा. अनिलकुमार टोंगे सर, श्री. उमेश रासेकर सर, ग्रंथपाल श्री. शुभम कडू आणि वाचनालयातील वाचक उपस्थित होते.
