जिल्हा परिषद खडका शाळेत शिक्षकदिनी शिक्षकांचा सत्कार


प्रतिनिधी,प्रवीण जोशी
यवतमाळ


महागाव येथिल पंचायत समितीमधील आदर्श व उपक्रमशील शाळा जिल्हा परिषद उच्च प्राथमिक डिजिटल मराठी शाळा खडका ५ सप्टेंबर रोजी भारताचे दुसरे राष्ट्रपती भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती तथा शिक्षक दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते. स्वयंशासन दिन हा उपक्रम सुद्धा राबविण्यात आला. नव्या देशमुख ,पौर्णिमा रोहनकर , शिवकन्या शिंदे ,प्रतिज्ञा देशमुख , आकांक्षा देशमुख, समीक्षा हाटेले, आशिष ठाकरे या सर्व विद्यार्थ्यांनी शिक्षक म्हणून अध्यापनाचे कार्य केले. समारोपीय कार्यक्रमात कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री दत्तराव कदम संचालक महागाव जिनिंग प्रेसिंग , प्रमुख पाहुणे संतोष देशमुख शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, डॉ. संदीप शिंदे शाळा व्यवस्थापन समिती बाल विकास तज्ञ, शरद देशमुख शाळा व्यवस्थापन समिती सदस्य , वनदेव खंदारे पालक, माधवराव मारडकर उपस्थित होते. शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने मुख्याध्यापक राहुल नागरगोजे, सहाय्यक शिक्षक विशाल शेळके, सहाय्यक शिक्षिका विश्रांती फोपसे, सहाय्यक शिक्षिका मोनाली चव्हाण या सर्व शिक्षकांचा पुष्पगुच्छ व पेन देऊन सत्कार करण्यात आला व शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या तसेच स्वयंशासन दिनानिमित्त शिक्षक झालेल्या सर्व शिक्षक विद्यार्थ्यांचे सुद्धा पुष्पगुच्छ व पेन देऊन स्वागत करण्यात आले. डॉ. संदीप शिंदे यांनी शिक्षक दिनाचे महत्त्व सांगितले तर श्री दत्तराव कदम यांनी स्वयंशासन दिनाच्या उपक्रमाचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिज्ञा देशमुख यांनी केले तर व मान्यवरांचे आभार शिवकन्या शिंदे हिने मानले.