
प्रतिनिधी:: प्रवीण जोशी
ढाणकी शहरातील मुख्य मंदिर ग्रामदैवत असलेल्या ठिकाणी एकूण जगातील सात चिरंजीवांपैकी एक असलेले बलोऊपासक अशी ख्याती प्राप्त श्री हनुमंतराय यांचा जन्म उत्सव अगदी उल्हास साथ व आनंदाने साजरा करण्यात आला. यावेळी श्री हनुमंतरायांची मूर्ती विलोभनीय दिसत होती अनेकांना नवसाला पावणारा श्री हनुमंतराय अशी ख्याती असलेल्या व मनोकामना पूर्ण होतात अशी भक्तांची श्रद्धा ढाणकी शहरातील श्री हनुमंत रायांची कीर्ती आहे.
मध्यरात्र झाल्यानंतर पुरोहितांनी शंखध्वनी करून अभिषेकाला सुरुवात केली यावेळी अभिषेकासाठी भक्तांचा जनसागर उसळला होता. रुचकीच्या फुलाची व वड्याची माळ घालून हनुमंतरायांना नैवेद्य दाखवून चरणी भक्त लिन झाले. यावेळी गेल्या काही दिवसापूर्वी झालेल्या रंग रंगोटीच्या कामामुळे व अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मंदिरावर टाकलेली रंगबिरंगी विद्युतरोषणाई मुळे मंदिर परिसर रात्रप्रहरी अधिकच लख्ख प्रकाश झोतात दिसत होते. जणू काही रामजन्मभूमीच्या महिमा दूरचित्रवाणीवर दाखवत होते तसाच ढाणकी शहरातील श्री हनुमंतराय मंदिर व आजूबाजूचा परिसर वाटत होता. आधुनिक रंगरंगोटीची व विद्युत रोषणाईची संकल्पना होती विष्णुदास वर्मा यांची व ती सत्यात उतरवण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते मरणादारी की तोरणादारी अर्थातच दुःखाच्या व सुखाच्या प्रसंगाला अनुसरून धावणारे गजानन गंजेवाड यांनी पण तितकीच मोलाची मदत यावेळी केली.
श्रीहनुमंतराय चरणी आपली सेवा अर्पण केली. तसेच श्रीनाथ येरावार हे ज्येष्ठ नागरिक असून सकाळच्या रामप्रहरापासून ते कार्यक्रम समाप्ती होईपर्यंत आपली सेवा दिली ज्येष्ठ नागरिक असून सुद्धा ही विशेष बाब म्हणावी लागेल.यावेळी अनेक भक्तांनी घडेल त्या पद्धतीने यथायोग्य व्यवस्थापनाला देणगी दिली. श्री हनुमंतराय हे शक्तीचे बलोपासक म्हणून अनेक जण या ठिकाणी लिन होतात. तसे श्री रामभक्त हनुमंताकडे असलेले निष्कपटता ऋतुजा आणि अलौकिक अशी विद्वत्ता व निर्मळ व गंगेसारखे स्वच्छ चरित्र स्पृहणीय आहे.श्रीहनुमंतरायाच्या अत्यंत प्रखर व मंगल चारित्र्यातील सदगुण सगळ्याच्या जीवनात यावा व खरी श्रद्धा प्रवर्धित व्हावी अशी अपेक्षा. एवढे सगळे अंजनी पुत्र हनुमंताकडे असेल म्हणून हनुमंतरायाला भक्तश्रेष्ठ पदवी दिलेली आहे.नंदी शिवाय शिवालय नाही तसेच श्री हनुमंता शिवाय श्रीराम नाही ही एक संकल्पना असून ती तितकी सत्य आहे!! जय जय रघुवीर समर्थ!!
दरवर्षी चैत्र पौर्णिमेला हनुमान जन्मोत्सव मोठ्या धुमधडाक्यात केल्या जातो. या वर्षी हनुमान जन्मोत्सव हा बारा एप्रिलला केल्या गेला. याच दिवशी माता अंजनी आणि वानरराज केसरीच्या घरी भगवान हनुमानचा जन्म झाला होता.
या वर्षी या पर्वावर काही खास बाबी निदर्शनास येत आहेत. कारण किती वर्षानंतर शुभ योगा मध्ये हे सर्व पर्व केल्या गेले. याच दिवशी मीन राशीत ग्रहाचा महासंयोग दिसून येतो. ज्यामुळे पंचग्रही राजयोगाची निर्मिती होणार आहे. ५७ वर्षानंतर पंचग्रहीत हनुमानाचा जन्मोत्सव झाला आहे. या आधी १९६८ रोजी असा योग आला होता. मीन राशि मध्ये बुध, शुक्र, शनी, राहू, आणि सूर्य ग्रह विराजित राहिले. याला अनुसरून मीन राशीमध्ये बुधादित्य, शुक्रादित्य, लक्ष्मीनारायण व मालव्य राजयोग अशी निर्मिती झालेली होती. यामुळे राशीमध्ये यांचा वावर होणार आहे त्यांचं भाग्य नक्कीच फुलू शकते व्यवसायामध्ये व करियर मध्ये मनाला लाभेल असे यश प्राप्त होऊ शकते.
