डॉ.राधाकृष्णन शाळेतील ०८विद्यार्थी स्कॉलरशीप धारक

प्रतिनिधी:चंदन भगत,आर्णी


डॉ.राधाकृष्णन उच्च प्राथमिक मराठी शाळा, आर्णी चे १२ विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षा पास तर ०८ विद्यार्थी स्कॉलरशिप धारक झाले.
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती इयत्ता ५ वी ची परीक्षा फेब्रुवारी २०२० मध्ये घेण्यात आली होती.डॉ.राधाकृष्णन शाळेतील ०८ विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक ठरल्याने शाळेसाठी व आर्णी शहरासाठी ही बाब कौतुकास्पद ठरली आहे.
इयत्ता ५ वी चा १.यश निलेश ठाकरे २.पार्थ दिनेश चौधरी ३.कु.श्रेया विष्णू वानखडे ४.कु.देशना अभयकुमार नहार ५.कु.भूमी योगेश बुटले ६.कु.सलवा राहील खान ७.कु.समृद्धी सतीशराव देशमुख ८.जुबिया निजामुद्दीन शेख हे विद्यार्थी स्कॉलरशिप धारक ठरले आहेत.
त्यांच्या यशस्वीते साठी शाळेच्या मुख्याध्यापिका मानिक देशमुख, नंदा काटोले, रविता राठोड, प्रमोद मांडवकर,सचीन इंगळे,कुलदीप मुडे, सुजाता तोटेवाड,अक्षय केशरवानी आदींचे मार्गदर्शन लाभले.
मुख्याध्यापिका,शिक्षकवृंद, पालक वर्ग यांच्याकडून सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे.
प्रतिनिधी:चंदन भगत,आर्णी