स्वतंत्र विदर्भ राज्य करीता
बोरी (वडकी ) येथे राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको

सहसंपादक : रामभाऊ भोयर

नागपूर येथे संविधान चौक डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळया जवळ स्वतंत्र विदर्भाच्या मागणी करीता आमरण उपोषणाला बसलेल्या विदर्भ राज्य आंदोलन समितीने जेष्ठ नागरीक यांच्या समर्थनार्थ दि. 28/12/2023 रोज गुरवारला दु 1.00 वाजता आणि शेतकरी नेते मा विजय निवल, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र झोटींग, कृष्णराव भोगांडे जिल्हाध्यक्ष विदर्भ राज्य आ़दोलन समिती,यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय महामार्गावर बोरी (ई) येथे 1.00 वाजता.

रास्ता रोको आंदोलन

विदर्भवादी भावांनो, बहिनांनो…

विदर्भातील जनतेला न्याय देण्यासाठी नागपूर करार करण्यात आला होता, त्या करारानुसार राज्याचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे आणि ते सुध्दा किमान 6 आठवळयाचे असे असतांना मात्र ती 6 ते 10 दिवसात आटपली ती पण विदर्भातील मुद्यावर नव्हता केवळ हुल्लळबाजी करण्यात येत असल्याचा आरोप देशोन्नतीचे मुख्य संपादक प्रकाश पोहरे यांनी पत्रकार परिषेद केला. नागपूर करार नुसार अधिवेशन घेतले जात नसल्याचा आरोप करीत येत्या 27 डिसेंबर रोजी प्रचंड संख्येत जेष्ठ नागरिक आणी युवक युवती यांच्या उपस्थितीत नागपुर येथिल संविधान चौकात आमरण उपोषणाला बसले आहेत. विदर्भाची मागणी 118 वर्षापासून आजतागायत पूर्ण केली जात नाही विदर्भातील आमदार सर्व सामान्य जनतेच्या प्रश्नावर बोलत नसल्याने जेष्ट पत्रकाला हाऊसमध्ये बोलावे लागले.

विदर्भवादी भावांनो, बहिनींनो जेष्ठ नागरीकांचे आमरण उपोषणाला समर्थन देण्यासाठी दि. 28/12/2023 ला मौजा

बोरी (ई)
ता.राळेगाव येथे दुपारी 1.00 वाजता रास्ता रोको आंदोलन मध्ये सामील व्हावे असे आवाहन गजानन पारखी, अक्षय महाजन, गोपाल भोयर विक्रम फटींग गजानन ठाकरे, महेश आवारी, बंडू येरगुडू, किसनराव पावडे, भास्कर पाटील, गजानन कोल्हे, बबनराव ठाकरे, धर्मेंद्र कुत्तरमारे, अमोल जवादे, यांनी केले.