“मॅसेज टू मुन” या उपक्रमा अंतर्गत नेताजी विद्यालयाच्या चार विद्यार्थ्यांची निवड

राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर

प्रथम एज्युकेशन फौंडेशन राळेगाव च्या वतीने गेल्या 23 वर्षांपासून विविध शैक्षणिक उपक्रम राबवले जातात. या उपक्रमा अंतर्गत2020 पासून क्रिएटिविटी क्लब च्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या हिताच्या विविध ऍक्टिव्हिटी राबवल्या जातात याच माध्यमातून मॅसेज टू मुन ही ऍक्टिव्हिटी राबवण्यात आली या मध्ये चंद्रायान 3 ही ऍक्टिव्हिटी राबविण्यात आली या यामध्ये चांद्रयान 3 ची प्रतिकृती तयार करणे, चांद्रयान 3 चे चित्र काढणे, इत्यादी ऍक्टिव्हिटी होत्या यामध्ये राळेगाव तालुक्यातील 1200 विद्यार्थ्यांने भाग घेतला होता त्यात 29 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली त्यामध्ये नेताजी विद्यालयाच्या चार विद्यार्त्यांची निवड झाली.निवड झालेल्या विद्यार्थ्यांना दि 14 आणि 15 डिसेंबर अश्या दोन दिवसीय सहलीवर पाठवण्यात आले ही सहल नागपूर येथे नेण्यात आली या सहली मध्ये विद्यार्थ्यांना विज्ञान रमण केंद्र दाखवण्यात आले यामुळे विद्यार्थ्यांचा वैज्ञानिक दृष्टीकोन वृद्धिंगत होण्यास मदत होणार आहे असे प्रथम एज्युकेशन चे को ऑरडी नेटर श्री प्रमोद कांबळे सर यांनी सांगितले नेताजी विद्यालय राळेगाव येथून निवड झालेले विद्यार्थी पुढील प्रमाणे चेतन ढिगोले, नव्या एलमुले,गुंजन मरसकोल्हे आणि अथर्व झाडे आहेत
या सहली साठी शाळेचे मुख्याध्यापक श्री ओंकार सर, तसेच इतर शिक्षक वृंदानी शुभेच्छा दिल्या