भा ज पा जिल्हाध्यक्ष विरुद्ध कार्यकर्त्यांचा विरोधाचा सूर ,आ उपमुख्यमंत्री, प्रदेश अध्यक्ष यांना पत्र लिहून जाहीर केली नाराजी


काल जाहीर झालेल्या लोकसभेच्या निकालात भाजपा चा पानिपत झाला असून कोणत्याही उमेदवाराला जिल्ह्यातुन मतदानात आघाडी मिळालेली नाही. या पक्षीय अपयशाचे नेते मंडळी जसे कारणे व मिमासा करत आहेत तसे कार्यकर्त्यांना सुद्धा या अनपेक्षित निकालाने धक्का दिला आहे. मात्र कार्यकर्त्यांची खद खद आता भाजपा जिल्हा अध्यक्षाच्या नाराजी ने बाहेर निघत आहे. येथील कार्यकर्ते नरेंद्र शिंदे यांनी थेट उपमुख्यमंत्री, प्रदेश अध्यक्ष यांना पत्र लिहून जिल्हा अध्यक्षाच्या कार्य शैली बद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
जिल्ह्यात सत्ताधारी सहा आमदार ही जिल्ह्यातील भाजपा चा अपयश रोखू शकले नाही.महाविकास आघाडी चे सर्व उमेदवार लाखोच्या मतधिक्याने निवडून आले.भाजपाच्या या अपयशाचा जो – तो आपल्या परीने कारणे व मिमासा करण्याचा प्रयत्न करत आहेच. मात्र जनतेने अनपेक्षित पणे भाजपा ला नाकारणे कार्यकर्त्यांना सुद्धा पचणी पडत नाही आहे. कार्यकर्त्यांना लागलेला धक्का भाजपा जिल्हा अध्यक्षा च्या नाराजी च्या रूपाने आता बाहेर येत आहे. येथील भाजपा चे कार्यकर्ते नरेंद्र शिंदे यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडवणीस व भाजपा प्रदेश अध्यक्ष बावनकुळे यांना पत्र लिहून जिल्ह्याचे अध्यक्षानी आपली जवाबदारी पूर्ण केली नसल्याचा ठपका ठेवत ज्या दिवसापासून नवीन जिल्हाध्यक्ष कार्यान्वित झाले त्या दिवसापासून आमच्या यवतमाळ व पुसद जिल्ह्याचा कारभार ढासळला आहे.या अध्यक्षांनी एका वर्षामध्ये किती मीटिंग घेतल्या व किती कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या असा प्रश्न विचारत अध्यक्ष फोन सुद्धा उचलत नसल्याचा आरोप या पत्रात केला गेला आहे. सोबतच वरिष्ठ नेत्यांनी भ्रष्ट नेत्यांना सोबत घेणे, शेतकरी हित जपल्या न गेल्याचा फटका पक्षाला बसल्याचा या पत्रात नमूद करतांना नेत्यांनी आत्म परीक्षणाची गरज सुद्धा अधोरेखित करण्यात आली आहे.कार्यकर्त्यांची खद खद व नाराजगी आगामी विधानसभा निवडणुका साठी मारक ठरू शकते या अनुषंगाने प्रयत्न केले जाण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

नेत्यां सह जिल्हाध्यक्ष ला आत्मपरीक्षणाची गरज –

जिल्ह्यात पक्षाला दारुण पराभव पतकरावे लागले आहे.
निवडणुका लागल्या नंतर जिल्हा अध्यक्ष पक्षीय बांधणीत कमी पडले. नियोजनाच्या कमतरतेचा फटका उमेदवारांना बसला आहे.त्यांच्या बाबतीत तीव्र नाराजगी आहे. या बाबतीत मा. उपमुख्यमंत्री व प्रदेश अध्यक्षाना या बाबतीत पत्र व्यवहार केला आहे.

नरेंद्र शिंदे, भाजपा कार्यकर्ते

तळगळातील सर्व कार्यकर्त्यांच्या संपर्कात –
लोकसभा निवडणुकात संपूर्ण राज्यातच पडझळ झाली आहे.जिल्ह्यातील सर्व नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी तन -मन -धनाने या निवडणुकात काम केल आहे. पक्षाच्या विचार धारे प्रमाणे जनता व कार्यकर्त्यांना सदैव केंद्रबिंदू मानून त्यांच्या सदैव संपर्कत राहुन बेठका घेतल्या आहेत.
-महादेव राव जी सुपारे
जिल्हा अध्यक्ष, भाजपा यवतमाळ

सर्वच स्थरातून चांगला काम झाला आहे.-
निवडणुका म्हटल्या की जय – पराजय होतच असतो.निकाल अनपेक्षित जरी असले तरी तो जनतेचा आदेश आहे. कोणतेही हेवे दावे न करता संपूर्ण पक्षाने ऐकजुटीने विजया साठी प्रयत्नांची परीकष्टा केली आहे. कोना वर ही ठपका ठेवण्यासाठी जागा शिल्लक राहिलेली नाही.येणारे विधानसभेला आणखी जोमात काम करू आणि निश्चिच विजयश्री खेचून आणू.
-डॉ इरफान कुंदन
प्रदेश उपाध्यक्ष, अल्पसंख्यांक आघाडी भाजपा, महाराष्ट्र