नांदेड जिल्ह्याच्या प्रगतीच्या मालिकेत पुढील कडी जोडत उद्घघाटनीय सोहळा संपन्न ,माहूर गडावर लागणार लिफ्ट


लोकहित महाराष्ट्र उमरखेड
तालुका प्रतिनिधी. संदीप जाधव

केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री,देशाचे विकास पुरुष, श्री. नितीन गडकरी जी यांच्या प्रमुख उपस्थितीसह ,जिल्हा न्यायाधीश तथा रेणुका माता संस्थानचे अध्यक्ष श्री.नागेश न्हावकर,खासदार श्री.हेमंत पाटील,आमदार राम पाटील रातोळीकर,आमदार डॉ.तुषार राठोड, आमदार भीमराम केराम, आमदार श्यामसुंदर शिंदे,आमदार मदनभाऊ येरावार आमदार नामदेव ससाणे भाजपा जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर व सर्व आमदार, भाजपा प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत भूमिपूजन संपन्न झाले.

श्री रेणुका माता मंदिरात जाण्यासाठी सध्या २४० पायऱ्या चढाव्या लागतात, हा स्कायवॉक तयार झाल्यानंतर पायऱ्या चढण्याची गरज भासणार नाही. या प्रकल्पामुळे रेणुका मातेचे दर्शन घेणे सोपे होणार आहे. वृद्ध आणि दिव्यांगांसाठी हे वरदान ठरणार आहे. या प्रकल्पांतर्गत मंदिरात जाण्यासाठी 4 कॅप्सूल लिफ्ट तयार केल्या जाणार आहेत, ज्यामुळे भाविकांना टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या स्टेशनवरून थेट मंदिरात जाता येईल आणि मंदिराच्या वरच्या बाजूला असलेल्या मंदिराजवळील स्थानकावर पोहोचता येईल.