

सहसंपादक : रामभाऊ भोयर
आपल्या देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांनी 2014 मध्ये निवडणुकीच्या तोंडावर आर्णी तालुक्यातील दाभाडी येथे देशातील शेतकऱ्यांना चाय पे चर्चा हा कार्यक्रम घेऊन भरमसाठ आश्वासने दिली होती परंतु या आश्वासनाची या सरकारने आजतागायत पुर्तता केली नाही म्हणून या दाभाडी या गावापासून येत्या 3 जूनला शेतकरी आत्मसन्मान पदयात्रा काढण्यात येणार असून ही पदयात्रा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत निघणार असून ही पद यात्रा ओंकारेश्वर मंदिर दाभाडी येथून निघणार असून या यात्रेचा समारोप कृषी उत्पन्न बाजार समिती आर्णी येथे मेळाव्याच्या स्वरुपाने होणार आहे.या सन्मान यात्रेत शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी, शेतमालाला हमी भाव, सरसकट पिकविमा, शेतकऱ्यांना मोफत विज, वन्य प्राण्यांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी काटेरी ताराचे कुंपण, कृषी पंपाचा बंद केलेला विजपुरवठा पूर्ववत सुरू करण्यात यावा, या सह अनेक मागण्यांसाठी हे आयोजन यवतमाळ जिल्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आले असून कांग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा हा दौरा या निमित्ताने यवतमाळ जिल्हात प्रथमच होणार असून या कार्यक्रमाच्या निमित्ताने यवतमाळ जिल्ह्यातील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या सर्व पदाधिकारी सर्वसामान्य कार्यकर्त्यांत नवचैतन्य निर्माण झाले असून ही आत्मसन्मान यात्रा यशस्वी करण्यासाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे यवतमाळ जिल्हा अध्यक्ष अँड प्रफुल्ल मानकर माजी मंत्री शिवाजीराव मोघे, माजी शिक्षणमंत्री प्राध्यापक वसंतराव पुरके सर, कांग्रेस पक्षाचे ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष अरविंद वाढोणकर, यांच्या सह अनेक मान्यवर प्रयत्न करत असून या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याबाबत सर्व शेतकऱ्यांना आवाहन करण्यासाठी राळेगाव येथील खरेदी विक्री संघाच्या कार्यालयात दिनांक 30 मे ला पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती या पत्रकार परिषदेला माजी शिक्षणमंत्री प्राध्यापक वसंतराव पुरके सर, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष अरविंद वाढोणकर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे राळेगाव तालुका अध्यक्ष राजेंद्र तेलंगे, शहराध्यक्ष प्रदीप ठुणे, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष मिलिंद इंगोले उपाध्यक्ष भरत पाल, वसंत जिनिंगचे अध्यक्ष नंदकुमार गांधी उपाध्यक्ष अंकुश रोहणकार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दिपक देशमुख, अंकुश मुनेश्वर, अंकित कटारिया,प्रकाश पोपट गोविंदा चहांदकर, श्रीधर थुटुरकर सर किशोर धामंदे अनिल देशमुख श्रावणसिंग वडते सर गजानन पुरोहित नितीन खडसे गजानन पाल अफसर अली गणेश नेहारे महादेव मेश्राम यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते त्यावेळी पत्रकारपरिषदेला पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रकाश मेहता,राजू रोहणकर, देशोन्नती प्रतिनिधी महेश शेंडे, आत्मबल साप्ताहिक आत्मबलचे संपादक मंगेश राऊत, लोकमतचे पिंपरे सर, तरूण भारतचे मोहन देशमुख सर, सोशल मीडिया तालुका अध्यक्ष विनोद माहुरे हिंदी वृत्तपत्राचे प्रतिनिधी गुड्डू मेहता,दादू भोयर पब्लिक पोस्टचे तालुका प्रतिनिधी मनोहर बोभाटे, राळेगाव साप्ताहिकाचे संपादक महेश भोयर मिलिंद धनविजय किरण हांडे यांच्या सह अनेक पत्रकार बांधव उपस्थित होते.या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने राळेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना येत्या 3 जूनला हजारोंच्या संख्येने आर्णी तालुक्यातील दाभाडी येथे उपस्थित राहण्याचे आवाहन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे राळेगाव तालुका अध्यक्ष राजेंद्र तेलंगे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
