
तिरोड़ा – स्थानिक जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय तिरोड़ा येथे आज दिनांक 28 जानेवारी 2023 रोज शनिवारला रस्ता सुरक्षा कार्यक्रमांतर्गत जनजागृती कार्यक्रम साजरा करण्यात आला. यात वर्ग 9 वी आटोमोबाइलच्या विद्यार्थ्यांनी पथनाटक व समूह गीताच्या माध्यमातून रस्ता सुरक्षेचे महत्त्व सांगितले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा समितीचे अध्यक्ष माननीय श्री किरण भाऊ पारधी, पंचायत समिती सदस्य जितेंद्र चौधरी तसेच शाळेचे मुख्याध्यापक मा. श्री. जी. एच. रहांगडाले, शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी आटोमोबाइल शिक्षक उमेंद्र रहांगडाले यांनी रस्ता सुरक्षा व दिवसेंदिवस रस्त्यावर वाढत्या अपघातावर रस्ता सुरक्षाचे व ट्रैफिक सिग्नल चे पालन करून स्वताची तसेच दुसर्याची सुरक्षा बदल मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे नियोजन वर्ग 9 वी आटोमोबाइल च्या विद्यार्थ्यांकडून करून घेण्यात आले.
