कोरोना महामारीमध्ये औषधे व सुविधेसाठी राज्याला निधी उपलब्ध करा, महाराष्ट्र नवनिर्मााण सेनेचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

– कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमध्ये वाढती रुग्णसंख्या पाहता या रुग्णांना वेळेवर व त्वरीत जीवनावश्यक औषधे व इतर आरोग्य सुविधा तात्काळ उपलब्ध होण्याच्या दृष्टीकोनातून राज्याला निधी उपलब्ध करुन देण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रभारी जिल्हाध्यक्ष मनिष डांगे यांच्या नेतृत्वात ६ एप्रिल रोजी मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले.
निेवेदनात नमूद आहे की, राज्यातील महामारी स्थिती व त्याकरीता आवश्यक असलेली जिवनरक्षक औषधेे, साहित्य सामुग्री, व प्राणवायु उपलब्ध करण्याकरीता, खरेदीकरीता निधी उपलब्ध व्हावा याकरीता विद्यमान विधानसभा सदस्य, विधान परिषद सदस्य व खासदार अनुक्रमे २८८, ७८ व ४४ इतकी आहे. तसेच माजी आमदारांची संख्या आहे. या सर्वांनी समाजातील कोरोना रुग्णांकरीता किमान प्रत्येकी किमान एक महिन्याचे वेतन अर्थसहाय्य करावे. जेणेकरुन करोडो रुपयाचा मदत निधी गोळा होईल. हा निधी कोरोना रुग्णांच्या उपचाराकरीता वापरावा. याकरीता शासन स्तरावरुन आवाहनवजा विनंती करण्यात यावी. गोळा होणारा निधी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा करण्यात यावा. सढळहस्ते मदतीकरीता आर्त हाक देण्याची गरज आहे. आपली अमुल्य आर्त हाक जनसामान्य कोरोना रुग्णाकरीता आवश्यक व जिवनदायी ठरेल. तरी याबाबत आवश्यक ती कार्यवाही तातडीने करावी अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली आहे.