शेतकरी पुत्र असलेल्या अंकुश मुनेश्वर यांनी शेतमजूराच्या उपस्थितीत शेतात केला वाढदिवस साजरा

सहसंपादक:- रामभाऊ भोयर

राळेगाव तालुक्यातील वेडशी येथील प्रतिष्ठित नागरिक तथा वेडशी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक पण व्यवसायाने शेतकरी असलेल्या शेतकरी पुत्र अंकुश मुनेश्वर यांचा आज दिनांक 10/6/2023 रोजी वाढदिवस असल्याने त्यांनी अतोनात खर्च न करता किंवा गाजावाजा न करता आपल्या स्वताच्या शेतात पत्नी,मुलगा, शेतात काम करणारी मानसे व शेतमजूर यांच्या उपस्थितीत एका झाडाखाली केक कापून वाढदिवस साजरा केला असून हा वाढदिवसाचा आगळा वेगळा उपक्रम अंकुश मुनेश्वर यांनी सुरू करून व सामान्य शेतकरी शेतमजूरांना आपल्या आनंदात सहभागी करून वाढदिवस साजरा केल्याने त्या परिसरात कौतुक, वाहवा केली जात आहे.