
प्रतिनिधी::प्रवीण जोशी
शहरात विजया दशमी निमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने पथसंचलन व शोभायात्रा शस्त्रपूजन दिनांक १२ ऑक्टोबर रविवार रोजी संपन्न होणार आहे. विजयादशमी हा पराक्रम आणि पौरूषत्व जागवणारा क्षण आहेच. शिवाय श्रीरघुनाथाचे कोदंड, श्रीकृष्णाचे सुदर्शन चक्र, दुर्गामातेचा त्रिशूल, आणि वीर छत्रपती शिवप्रभूंची तलवार या सारख्या शस्त्रांचे पूजन करून संघ समान, संघटित , एकत्रित, समरस करावयाचे कार्य करत असताना संघाला १०० वर्षे पूर्ण झाले व हा ऐतिहासिक क्षण आहे. शताब्दीपूर्ती होत असल्याने शहरात विजयादशमी सोहळ्याची सुरुवात भगव्या ध्वजाला वंदन व प्रार्थनेने होईल विजया दशमी सोहळ्याने ढाणकी येथे उत्साह आणि अध्यात्मिक ऊर्जा तेवत राहील.
या सोहळ्याला संबोधित करण्यासाठी यवतमाळ येथील सक्षमचे विदर्भ प्रांत सचिव संजय श्रीधरराव दंडे हे मुख्य वक्ते म्हणून उपस्थित राहणार असून या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून बिटरगाव (बु)येथील प्रगतीशील कास्तकार निवृत्त भारतीय सैनिक दलातील उत्तमराव साहेबराव शिरगरे हे असणार. या शताब्दी पूर्ती निमित्ताने परिसरातील गाव खेड्यातील वाडीवस्ती वरील संघ विचारधारा मानणाऱ्या जनसमुदायाने सहभागी होण्याचे आव्हान करण्यात आले आहे.
शताब्दी निमित्ताने पंचसूत्री संदेश सामाजिक बांधिलकी, मूल्याचा प्रसार, देशातील शेवटच्या घटकापर्यंत नेण्यास प्रारंभ झाला असून यातून सामाजिक ऐक्य, कुटुंब प्रबोधन, पर्यावरण संरक्षण, स्वबोध आणि नागरी शिष्टाचार, या पंचसूत्री बाबत आगामी वर्तमान परिस्थितीत कर्तव्य करण्याचा संदेश देण्यात येईल प्रत्येक स्वयंसेवकाने स्वतःच्या क्षेत्रात सक्रिय राहून समाज परिवर्तनाचे काम करावे हा या संचलनाचा मुख्य गाभा असणार.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने विजयादशमी चे साधर्म्य आखून शताब्दी वर्षाच्या उत्सवाची सुरुवात केली २ ऑक्टोबर २०२५ ते २० ऑक्टोबर २०२६ या कालावधीत हिंदुस्थानात ७ प्रमुख कार्यक्रमाचे आयोजन होणार आहे. संघाचा शंभर वर्षाचा प्रवास सध्याची ध्येय आणि जनसमुदाया समोरील उपाय सादर होतील हे त्याचे उद्दिष्ट असणार. परिसरापासून प्रांतीय ठिकाणापर्यंत कार्यक्रमाचे आयोजन होणार असून पश्चिम बंगाल पासून नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासूनच हा उपक्रम संपन्न झाला.संघप्रमुख मोहनजी भागवत इतर खंडातील देशाच्या दौऱ्यावर जाणार असून ते अमेरिका आणि युरोप सारख्या देशातील कार्यक्रमांना उदबोधित करू शकतात. संघप्रमुख कोणत्या देशाचा दौरा करणार याचा निर्णय येणाऱ्या नोव्हेंबर मध्ये जबलपूर येथे होणाऱ्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत होईल.