
उमरखेड तालुका प्रतिनिधी :-विलास तुळशीराम राठोड, (ग्रामीण )
मो.7875525877
आगामी लोकसभा व त्यानंतरच्या विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून केंद्राच्या पीएम किसान योजनेच्या पार्श्वभूमीवर राज्याने ‘नमो महासन्मान’ योजना सुरू केली आहे. या योजनेचा पहिला हप्ता आज, २६ ऑक्टोबरला वितरित केला जाणार आहे. अमरावती विभागातील १२ लाख २५ हजार ३७५ शेतकरी त्यासाठी पात्र ठरले आहेत.
शेतकऱ्यांना दर चार महिन्यांनी दोन हजार रुपये, असा तीन हप्त्यात वार्षिक सहा हजार रुपये लाभ देण्याची ही योजना आहे. आधी ही योजना महसूल विभागाकडून राबविण्यात येत होती. आता ती कृषी विभागाकडे हस्तांतर केली आहे.
केंद्र सरकारकडून पीएम किसान योजनेसोबतच राज्याच्याही योजनेत तितकाच लाभ देण्यात येणार आहे. त्यामुळे दोन्ही योजनांचे वर्षाला बारा हजार रुपये मिळणार आहेत. राज्याची योजना राबविण्यासाठी लॉग-इन आयडी मिळण्यास विलंब झाल्याने व महसूल तथा कृषी विभागातील असमन्वयाने शेतकऱ्यांना लाभ मिळण्यासही विलंब झाला आहे.
त्याचा मुहूर्त निघाला असून येत्या २६ ऑक्टोबरला पहिला हप्ता वितरित करण्यात येणार आहे, अशी माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे. अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांतील १२ लाख २५ हजार ३७५ शेतकरी पात्र ठरले आहेत.
जिल्हानिहाय पात्र शेतकरी
▪️अकोला १,८४,६७३
▪️अमरावती २,६४,९७५
▪️यवतमाळ २,८४,३३३
▪️वाशीम १,६१,३५८
▪️बुलडाणा ३,३०,०३६
