
सहसंपादक : रामभाऊ भोयर
वर्धा नदीपात्रातून तालुक्यात दररोज मोठ्या प्रमाणात अवैध रेती तस्करी होत असल्याने महसूल विभागाने अवैध रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर पकडण्याची मालिका सुरू केली आहे. या आठवड्यात दररोज एक दोन एक दोन ट्रॅक्टर पकडण्यात येत असून आज दिं.१३ मार्च २०२५ रोज गुरुवारला जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी राळेगाव तसेच मा.अमित भोईटे तहसीलदार राळेगाव यांचे मार्गदर्शनाखाली सकाळी अंदाजे ७:०० वाजताचा दरम्यान मौजा येवती येथे अवैध रेतीची वाहतूक करतांना एक ट्रॅक्टर जप्त केला आहे. ही सदरची कार्यवाही एम.डी सानप मंडळ अधकारी किन्ही ज एन. जे. देवळे ग्रा. म. अधिकारी तसेच सुनिल कुऱ्हे शासकीय वाहन चालक यांचे पथकाने केली असून ट्रॅक्टर दंडात्मक कारवाई करीता पोलीस स्टेशन वडकी येथे लावण्यात आल आहे.
मागील चार-पाच दिवसांपूर्वी सहाय्यक उपजिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी राळेगाव विशाल खत्री यांनी ७ मार्च रोजी मोठ्या सीताफीने झुल्लर घाटातून दहा ट्रॅक्टर जप्त केले होते त्यानंतर दोन दिवसापूर्वी बोरी मेगापूर घाटातून १० मार्च रोजी साडेदहा वाजता च्या दरम्यान ३ ट्रॅक्टर पकडण्यात आले होते ही कारवाई एमडी सानप मंडळ अधिकारी किन्ही,गाईड चौहान,मंडळ अधिकारी राळेगाव, एस एस तुमस्कर ए आर ओंकार,ए बी शिरभाते महसूल अधिकारी तसेच सुनील कुऱ्हे वाहन चालक यांनी केले होती त्यानंतर १२ मार्च रोजी तहसीलदार अमित भोईटे यांनी रिधोरा फाट्यावर अवैध रेती वाहतूक ल करत असलेल्या ट्रॅक्टर पकडून वडकी पोलीस स्टेशनला जमा केला त्यानंतरही आजही येवती येथे अवैध रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर जप्त करण्यात आला असून तालुक्यात सतत अवैध रेती ट्रॅक्टर पकडण्यात येत असल्याने जणू अवैध रेती ट्रॅक्टर पकडण्याची मालिका महसूल विभागाने सुरू केल्याचे दिसून येत आहे.
