मनसे उमेदवार अशोक मेश्राम यांचा प्रचार नारळ फुटला,राजसाहेब ठाकरे यांची जाहीर सभा

राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार श्री अशोक मेश्राम यांचा प्रचाराचा नारळ असंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत फोडण्यात आला.त्यावेळी मनसे राज्य उपाध्यक्ष आनंदभाऊ एबंडवार,देवाभाऊ शिवरामवार, शंकर भाऊ वरघट, तीन ही तालुक्यातील तालुका प्रमुख, मुन्नाभाई सैय्यद, युसुफभाई व असंख्य कार्यकर्ते हजर होते.यावेळी सर्वांनी निर्धार केला की अशोक मेश्राम यांना निवडुन आणायचे . त्यादृष्टीने माननीय राजसाहेब ठाकरे यांची जाहिर जंगी सभा दिनांक 5 नोव्हेंबर 2024 रोजी गांधी ले आऊट चे मैदानावर ठीक 3.00 वाजता ठेवण्यात आली आहे.